पहिल्या सेलवर जबरदस्त डील ! 50MP कॅमेरा असलेल्या Moto G42 वर मिळतेय भारी सूट
Moto G42 स्मार्टफोनची पहिली विक्री आज
पहिल्या विक्रीमध्ये फोनवर मिळतेय भारी सूट
ग्राहकांना स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार
MOTOROLA ने गेल्या आठवड्यात भारतात आपला नवीन G सीरीज स्मार्टफोन Moto G42 लाँच केला. त्याची विक्री आजपासून सुरू झाली आहे. तुम्ही हा ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कंपनीचा हा फोन फक्त 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. त्याची किंमत 13,999 रुपये आहे. सेलमध्ये, हा फोन 1,000 रुपयांपर्यंत त्वरित डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. या सवलतीसाठी, तुम्हाला SBI च्या क्रेडिट कार्डने पेमेंट करावे लागतील. याशिवाय तुम्ही Axis Bank कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5% झटपट सूट देखील मिळेल. येथून खरेदी करा…
हे सुद्धा वाचा : OTT RELEASE : हे चित्रपट जुलैमध्ये OTT वर होणार रिलीज, मोठ्या पडद्यावर घातला धुमाकूळ
Motorola G42 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये, कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4-इंच फुल HD + OLED डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये आढळणारा हा डिस्प्ले पंच-होल डिझाइन आणि नाईट मोडसह येतो. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. प्रोसेसर म्हणून, कंपनी यात स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देत आहे, ज्यामध्ये Adreno 610 GPU आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश आहे. दरम्यान, तुम्हाला फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा पाहायला मिळेल.
साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि डॉल्बी ATMOS साउंडने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये कंपनी 5000mAh बॅटरी देत आहे. ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला फोनमध्ये Dual 4G VoLTE, Wi-Fi, GPS, NFC आणि ब्लूटूथ 5.0 सारखे पर्याय देण्यात आले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile