Moto G35 5G First Sale: Motorola ने नुकतेच भारतीय बाजारात Moto G35 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. त्यानंतर, आज या फोनची पहिली सेल 16 डिसेंबर 2024 रोजी आहे. ही सेल ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी हा फोन 50MP कॅमेरासह सुसज्ज आहे. तसेच, हँडसेटमध्ये जलद चार्जिंगसह सुसज्ज असलेली मोठी 5000mAh बॅटरी आहे. जाणून घेऊयात Moto G35 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Motorola च्या नवीनतम Moto G35 5G ची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. हे उपकरण आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वरून खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर Axis बँकेकडून 5% कॅशबॅक दिला जात आहे. त्याबरोबरच, या फोनवर 620 रुपयांमध्ये मासिक EMI उपलब्ध असेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Motorola चा नवीन स्मार्टफोन Moto G35 हा 6.7-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz आणि रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरळीत कामकाजासाठी, या मोबाईल फोनमध्ये Unisoc T760 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करते. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शन्ससाठी या स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 बसवण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी नवीनतम Moto G35 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तसेच, यात LED लाईट देखील देण्यात आले आहे. तसेच, याद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्ड देखील करता येतील. तसेच, आकर्षक व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी दिली आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे.