Motorola ने आगामी स्मार्टफोन Moto G34 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हा फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच केला होता. त्याच वेळी, हा फोन 1 महिन्यानंतर भारतात लाँच होणार, असे सांगण्यात आले होते. Moto G34 5G फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे फोनची लाँच डेट आणि सर्व स्पेसिफिकेशन्स देखील उघड झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आगामी Moto G34 5G फोनची लाँच डेट आणि सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: UPI New Rules 2024: RBI ने नवीन वर्षात जारी केले नवे नियम, UPI ची सुरक्षा आता एक पाऊल पुढे। Tech News
Moto G34 5G स्मार्टफोन भारतात 9 जानेवारी 2024 रोजी लाँच होईल. फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाइव्ह झाली आहे. वर सांगितल्याप्रमाणे फोनची लाँच या साइटवरूनच समोर आली आहे. या व्यतिरिक्त फोनच्या डिझाईनची माहिती आणि काही प्रमुख स्पेसिफिकेशन्स देखील या साइटद्वारे समोर आले आहेत.
फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, Moto G34 5G फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा डिस्प्ले असेल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. याशिवाय, हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज असेल. ज्यासह 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. एवढेच नाही तर, फोनमध्ये 8GB रॅम व्हर्चुअल रॅम देखील दिली जाईल.
फोटोग्राफीसाठी, Moto G34 5G स्मार्टफोनमध्ये 50MP क्वाड पिक्सेल कॅमेरा दिला जाईल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोनची बॅटरी 5000mAh असेल, ज्यामध्ये टर्बोपॉवर चार्जिंग सपोर्ट असेल. हा फोन Android 14 वर काम करेल. फोनला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग देण्यात आले आहे.