Jio Special Offer! ‘या’ नव्या 5G फोनच्या खरेदीवर मिळतोय 4500 रुपयांचे Discount व्हाउचर, आत्ताच बुक करा

Jio Special Offer! ‘या’ नव्या 5G फोनच्या खरेदीवर मिळतोय 4500 रुपयांचे Discount व्हाउचर, आत्ताच बुक करा
HIGHLIGHTS

Moto G34 5G स्मार्टफोन अखेर भारतात Jio च्या अप्रतिम ऑफरसह लाँच

ग्राहकांना या फोनसह 2000 रुपयांचे रिचार्ज व्हाउचर मिळतील.

Moto G34 5G 17 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजतापासून खरेदीसाठी उपलब्ध होणार

मागील काही काळापासून चर्चेत असलेला स्मार्टफोन Moto G34 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. हा परवडणारा स्मार्टफोन तुम्हाला उत्तम स्टॉक अँड्रॉइड अनुभव देणार आहे. या प्राईस बजेटमध्ये हा सर्वोत्तम स्मार्टफोन आहे, असे सांगितले जात आहे. पण तुम्हाला एक विशेष बाब माहिती नाही. विशेष म्हणजे हा डिवाइस 4500 रुपयांच्या Jio ऑफरसह लाँच करण्यात आला आहे.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Moto G34 5G फोनसोबत उपलब्‍ध असलेल्या Jio ऑफरबद्दल सांगणार आहोत. त्याबरोरबच, फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल देखील माहिती बघुयात.

Moto G34 5G Jio ऑफर

Reliance Jio Offer on Moto G34 5G

Moto G34 5G सह ग्राहकांना Jio कडून 4500 रुपयांचे लाभ मिळतील. यामध्ये 2000 रुपयांचे रिचार्ज व्हाउचर मिळतील, ज्यात प्रत्येकी 50 रुपयांचे 40 व्हाउचर समाविष्ट असतील. लक्षात घ्या की, हे व्हाउचर्स 399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर लागू होतील.

एवढेच नाही तर, Ajio द्वारे 2,500 रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला 500 रुपयांचे डिस्काउंट व्हाउचर देखील मिळेल. याशिवाय, ग्राहकांना 500 रुपयांची नेटमेड्स वॉलेट कॅश ऑफर केली जाईल. तसेच, Yatra द्वारे फ्लाइट बुकिंगवर 1500 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे.

Moto G34 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G34 5G Design
Moto G34 5G Design

Moto G34 5G स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,999 रुपये इतकी आहे. हा फोन चारकोल ब्लॅक, आइस ब्लू आणि ओशन ग्रीन म्हणजेच पीयू व्हेगन लेदर या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. हे उपकरण 17 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजतापासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल तुम्हाला कोणतीही तक्रार राहणार नाही. कारण, Motorola चा हा नवीन स्मार्टफोन 6.5-इंच लांबीच्या HD + LCD डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 695 चिपसेट, 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी शूटर, 5000mAh बॅटरी आणि 20W फास्ट चार्जिंगसह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo