मागील काही काळापासून चर्चेत असलेला Moto G34 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात अखेर लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रारंभिक लाँच ऑफरसह सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. हा मोटोरोला फोन दोन रॅम प्रकारांसह आणला गेला आहे. हे ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येते. हा स्मार्टफोन मोठ्या बॅटरी पॅकसह आणण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात लेटेस्ट Moto G34 5G स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: How to: तुमचा Smartphone पुन्हा पुन्हा गरम होत आहे का? जाणून घ्या कारण आणि समस्येवरील 5 सोपे उपाय। Tech News
Motorola G34 5G स्मार्टफोन भारतात 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर, या फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन चारकोल ब्लॅक, आइस ब्लू आणि ओशन ग्रीन कलर ऑप्शन्ससह सादर केला गेला आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची सेल 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विकला जाईल.
ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध असेल. या ऑफरसह तुम्ही 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत फोन खरेदी करू शकता.
Motorola च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा IPS LCD HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यात 8GB पर्यंत रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. सिक्योरिटीसाठी, या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल. त्याबरोबरच, फोनमध्ये गुगल असिस्टंटचाही सपोर्ट आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP दुय्यम सेन्सरचा समावेश आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय, फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जो 20W चार्जिंगच्या सपोर्टसह आहे. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 3.5 मिमी हेडफोन जॅक, 2 मायक्रोफोन, USB टाइप-C पोर्ट आणि स्टिरिओ स्पीकर यांसारखी फीचर्स आहेत.