Motorola ने युरोपमध्ये Moto G32 स्मार्टफोन लाँच केला आहे, जो तेथील मिडरेंज मार्केटची पूर्तता करेल. हँडसेट हा Moto G42 स्मार्टफोनचे थोडे अपग्रेड केलेले वर्जन असल्याचे दिसते. जे या महिन्याच्या सुरुवातीला भारतात लाँच झाले होते. मोटो G32 च्या प्रमुख फीचर्समध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट, 4GB RAM, 128GB स्टोरेज, 90Hz डिस्प्ले, 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 5,000mAh बॅटरी आणि बरेच काही समाविष्ट आहे. फोनची किंमत आणि उपलब्धता तपशील येथे पहा…
हे सुद्धा वाचा : Box Office Collection : 'एक व्हिलन रिटर्न्स' आणि 'विक्रांत रोणा' मध्ये चुरशीची स्पर्धा, सोमवारी झाली कोट्यवधींची कमाई
युरोपमध्ये, Moto G32 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत €230 (~19,000 रुपये) आहे. देशात सॅटिन सिल्व्हर आणि मिनरल ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये ते उपलब्ध असेल.
मात्र, तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, डिव्हाइसने भारत आणि लॅटिन अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची पुष्टी केली आहे.
Moto G32 मध्ये FHD + रिझोल्यूशन आणि 405 PPI काउंटसह 6.5-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेला DCI-P3 कलर गॅमट आणि 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट मिळत आहे. याशिवाय, डिवाइसला स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे, जो 2.4GHz वर क्लॉक आहे. प्रोसेसर Adreno 610 GPU, 4GB LPDDR4x रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह जोडलेला आहे. मायक्रो SD कार्डने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
Moto G32 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP (f/1.8) प्रायमरी शूटर, 8MP (f/2.2) अल्ट्रावाइड आणि डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो शूटर आहे. फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळत आहे, जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये ग्राहकांना टाइप C कनेक्टर मिळेल.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, Moto G32 4G LTE, ब्लूटूथ 5.2, ड्युअल-बँड Wi-Fi, ड्युअल सिम, GPS, NFC आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक ऑफर करतो. ऑडिओसाठी, Moto G32 ला Dolby Atmos सह ड्युअल स्टिरीओ स्पीकर मिळतात. डिव्हाइसमध्ये दोन मायक्रोफोन आणि साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, Moto G32 Android 12 मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.