MOTOROLA G32 चा 8GB रॅम व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिएंटची पहिली विक्री आजपासून सुरू होत आहे. दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वरून खरेदी करता येईल. जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्यावर उपलब्ध ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. पहिल्या सेलमध्ये या फोनवर ऑफर्सचा वर्षाव होतोय. बघुयात सविस्तर
या फोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची MRP 18,999 रुपये आहे. पण 36% डिस्काउंटसह त्याची किंमत 11,999 रुपये आहे. यावर थेट 7,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक दिला जाईल. याशिवाय EMI साठी तुम्हाला दरमहा 422 रुपये द्यावे लागतील. यासोबतच 1 वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे.
MOTOROLA G32 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.55 इंच फुल HD प्लस डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर आहे. यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्टवर भेट देऊ शकता.
याशिवाय, फोनची बॅटरी 5000mAh आहे. तसेच ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा 8 मेगापिक्सेलचा आणि तिसरा 2 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.