Motorola आज 9 ऑगस्ट रोजी आपला नवीन बजेट स्मार्टफोन Moto G32 भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा कंपनीचा G सिरींजमधील सहावा हँडसेट असेल आणि Moto G22 ची जागा घेईल. Moto G32 गेल्या महिन्यात युरोपमध्ये सादर करण्यात आला होता. अधिकृत लाँचआधी, टिपस्टर मुकुल शर्माने Moto G32 च्या भारतीय वर्जनचे डिझाइन शेअर केले आहे. यासोबतच फोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमतही लीक झाली आहे. चला तर जाणून घेऊयात फोनबद्दल सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : Online Shopping : 'FLIPKART' आणि 'AMAZON' पेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहेत 'या' शॉपिंग वेबसाईट्स
मागील लीकच्या आधारे, Moto G32 मॉडेल क्रमांक XT2235-3 सह येईल. G32 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि 33W फास्ट चार्जिंगसाठी समर्थन देते. Twitter वरील टीझर 50MP मेन कॅमेरा आणि इतर दोन कॅमेर्यांसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपच्या उपस्थितीची पुष्टी करतो. फोनमध्ये दोन 2MP सेन्सर असण्याची शक्यता आहे, जे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर असू शकतात. डिव्हाइसच्या मध्यभागी एक सेल्फी कॅमेरा दिला जाईल.
या व्यतिरिक्त, Moto G32 भारतात ब्लॅक आणि गोल्ड कलर पर्यायांमध्ये येण्याची शक्यता आहे. नवीनतम लीकमध्ये रेड आणि सिल्वरचे कलर ऑप्शन्सदेखील उघड झाले आहेत. Moto G32 मध्ये हूड अंतर्गत UniSoC T606 प्रोसेसर असल्याची चर्चा आहे. फोन 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा डिस्प्ले पॅनेल देऊ शकतो.
Moto G32 ची विक्री Flipkart द्वारे केली जाईल आणि भारतात त्याची किंमत सुमारे 13,000 रुपये असू शकते. युरोपमध्ये Moto G32 ची सुरुवातीची किंमत EUR 230 अंदाजे 18,650 रुपये ठेवण्यात आली आहे.