Motorola च्या लेटेस्ट स्मार्टफोन Moto G32 ची विक्री सुरु झाली आहे. तुम्ही ते फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. त्याची किंमत 12,999 रुपये आहे. फोन खरेदी करताना तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्डने नॉन EMI व्यवहार केल्यास तुम्हाला 1 हजार रुपयांची सूट मिळेल.
हे सुद्धा वाचा : Vodafone Idea च्या ग्राहकांना मिळतोय मोफत 75GB डेटा, जाणून घ्या काय आहे ऑफर
त्याबरोबरच , जर तुम्ही त्याच बँकेच्या क्रेडिट कार्डने EMI व्यवहार केला तर तुम्हाला 1250 रुपयांचा फायदा मिळेल. Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. खास गोष्ट म्हणजे तुम्ही मोटो G32 देखील जबरदस्त एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास तुम्हाला 12 हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
फोनमध्ये कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा फुल HD + LCD पॅनेल देत आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रीफ्रेश रेट आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. Moto G32 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देत आहे. फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी LED फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत.
इतर वैशिष्ट्यांमध्ये, फोन Android 12 वर आधारित MyUX स्किनसह येतो. फोनमध्ये आणखी Android 13 अपडेट मिळेल आणि पुढील तीन वर्षांसाठी सिक्योरिटी पॅच देखील येत राहतील. फोन डॉल्बी ATMOS साउंड सपोर्टसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला 3.5mm हेडफोन जॅक, 4G, ब्लूटूथ 5.2 आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय मिळतील.
यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी कंपनी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जिंग देते.