मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला Motorola चा लेटेस्ट Moto G24 Power स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. किंमत श्रेणीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने हा फोन 10 हजारांपेक्षा लो बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. विशेष म्हणजेच या किमतीत तुम्हाला फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर, फोनमध्ये अनेक पॉवरफुल आणि अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सचे सर्व तपशील.
Moto G24 Power स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या बेस म्हणेजच 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तर, 8GB रॅम आणि 128GB टॉप व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता Flipkart वर सुरू होईल. फोनमध्ये ग्लेशियर ब्लू आणि इंक ब्लू हे दोन कलर ऑप्शन्स आहेत.
Moto G24 Power स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा LCD HD+ डिस्प्ले आहे. स्मूथ फंक्शनिंगसाठी फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB+8GB पर्यंत 16GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 14 वर कार्य करेल. सुरक्षेसाठी फोनमध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी, Moto G24 Power फोनमध्ये 50MP क्वाड पिक्सेल प्राथमिक कॅमेरा आहे. त्याबरोबर, फोनमध्ये 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 6000mAh आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, पाण्याच्या संरक्षणासाठी यामध्ये IP52 रेटिंग देण्यात आली आहे.