6000mAh बॅटरीसह Motorola चा Affordable फोन 30 जानेवारीला भारतात येणार, बघा सर्व डिटेल्स। Tech News 

6000mAh बॅटरीसह Motorola चा Affordable फोन 30 जानेवारीला भारतात येणार, बघा सर्व डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

Motorola ने भारतात Moto G24 Power लाँच करण्याची तारीख कन्फर्म

Moto G24 Power ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता

आगामी फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह देखील झाली आहे.

Motorola ने भारतात Moto G24 Power लाँच करण्याची तारीख कन्फर्म केली आहे. कंपनीचा हा आगामी G-सीरीजचा बजेट स्मार्टफोन भारतात 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला होईल. कंपनीने नुकतेच जागतिक बाजारपेठेत Moto G24 स्मार्टफोनही लाँच केला आहे. आगामी G24 पॉवरची डेडिकेटेड मायक्रोसाइट ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर लाइव्ह देखील झाली आहे. ज्याद्वारे या स्मार्टफोनची सर्व फीचर्स उघड झाली आहेत.

Moto G24 Power ची अपेक्षित किंमत आणि उपलब्धता

मायक्रोसाईटनुसार, G24 पॉवरची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हा फोन Flipkart, Motorola च्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरद्वारे विकले जाईल. स्मार्टफोन ग्लेशियर ब्लू आणि इंक ब्लू कलर पर्यायांमध्ये लाँच केला जाईल.

Moto G24 Power चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Motorola चा हा Moto G24 Power अल्ट्रा प्रीमियम डिझाइनसह येणार आहे. यामध्ये 6.6-इंच लांबीचा इमर्सिव पंच होल डिस्प्ले आहे. तर,परफॉर्मन्ससाठी हे MediaTek Helio G85 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. यामध्ये 8GB इन-बिल्ट रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. रॅम आणखी 8GB पर्यंत वाढवता येऊ शकते म्हणजेच तुम्हाला एकूण 16GB रॅम मिळेल. हा फोन 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये देखील उपलब्ध असेल.

MOTOROLA MOTO G24 POWER

फोटोग्राफीसाठी Motorola हा फोन 50MP क्वाड पिक्सेल कॅमेरासह सादर करणार आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16MP सेन्सर असेल. फोनला पॉवर करण्यासाठी, त्यात 6000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे जी 33W टर्बोपॉवर चार्जिंगला सपोर्ट करेल.

फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, डिव्हाइसमध्ये तुम्हाला डॉल्बी ATMOS, मोटो जेश्चर, फेस अनलॉक, IP52 वॉटर रेझिस्टंट आणि साइड फिंगरप्रिंट सेन्सर इ. अतिरिक्त फीचर्स देखील मिळणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo