Moto G24 Power ची आज पहिली सेल सुरु, Flipkart वर लेटेस्ट स्मार्टफोन्स Best ऑफर्ससह उपलब्ध। Tech News 

Moto G24 Power ची आज पहिली सेल सुरु, Flipkart वर लेटेस्ट स्मार्टफोन्स Best ऑफर्ससह उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Moto G24 Power स्मार्टफोनची सेल भारतात आजपासून सुरु

Moto G24 Power स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध

Motorola चा Moto G24 Power स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, या स्मार्टफोनची विक्री आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे. त्यामुळे पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताना अप्रतिम ऑफर्स मिळत आहेत. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे, त्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. होय, मोटोरोलाने दमदार फीचर्स असलेला हा स्मार्टफोन कमी किमतीत सादर केला आहे. जाणून घ्या Moto G24 Power ची किंमत, ऑफर्स आणि सर्व फीचर्स-

हे सुद्धा वाचा: आगामी iQOO Neo 9 Pro सुरुवातीची किंमत लीक! स्मार्टफोनचे Important फीचर्स देखील उघड। Tech News

Moto G24 Power ची पहिली सेल

Motorola G24 Power ची पहिली सेल आज म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरू होईल. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 9,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ऑफर्सबबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी केल्यास एक्स्चेंजवर 750 रुपयांची सूट आहे. हा स्मार्टफोन ग्लेशियर ब्लू आणि इंक ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. येथून खरेदी करा

MOTOROLA MOTO G24 POWER

Moto G24 Power चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD + IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. चांगल्या कामगिरीसाठी, यात Mediatek Helio G85 प्रोसेसर आहे. फोन Android 14 वर कार्य करेल. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने ते 1TB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मागे 50MP मुख्य आणि 2MP दुसरा कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आलेली आहे आहे, जी 33W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टने सुसज्ज आहे. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, Wi-Fi आणि हेडफोन जॅक इ. आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo