Affordable! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G24 स्मार्टफोन ग्लोबली लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News

Updated on 24-Jan-2024
HIGHLIGHTS

जागतिक स्तरावर Moto G24 स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

Moto G24 डिव्हाइस केवळ एका म्हणजेच सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच

डिव्हाइसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हेलिओ जी85 चिपसेट स्थापित केला आहे.

Motorola ने जागतिक स्तरावर Moto G24 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन सादर करून कंपनीने त्यांच्या G-सिरीज स्मार्टफोन्सच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. या उपकरणाची खास गोष्ट म्हणजे कंपनीने हा फोन कमी बजेटमध्ये 8GB रॅम, 5000mAh बॅटरी, MediaTek Helio G85 चिपसेट, 6.6 HD Plus 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह बाजारात आणला आहे. बघुयात Moto G24 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Moto G24 ची किंमत

युरोपमध्ये Moto G24 डिव्हाइस सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 4GB RAM + 128 GB स्टोरेजची किंमत भारतीय किंमतीनुसार 129 युरो म्हणजेच 11,600 रुपये आहे. हा फोन आइस ग्रीन, मॅट चारकोल, ब्लूबेरी आणि पिंक लॅव्हेंडर या चार कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा स्‍मार्टफोन येत्या काळात लवकरच मार्केटमध्‍येही लाँच केला जाण्‍याची शक्यता आहे.

Moto G24 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G24 मध्ये 6.6 इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले आहे, जो 90Hz रीफ्रेश रेट आणि 537nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीने स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी डिव्हाइसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हेलिओ जी85 चिपसेट स्थापित केला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. त्याबरोबरच, 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. इतकेच नाही तर, मायक्रो SD कार्ड स्लॉटच्या मदतीने इंटरनल स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा स्पेसीफिएक्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G24 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो लेन्स LED फ्लॅशसह येतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोन दीर्घकाळ टिकणाऱ्या 5000mAh बॅटरी आणि 15W टर्बो चार्जिंगसह सुसज्ज आहे.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी IP52 रेटिंग, ऑडिओसाठी 3.5 मिमी हेडफोन जॅक, स्टीरिओ स्पीकर, डॉल्बी ATMOS, ड्युअल सिम 4G, ब्लूटूथ 5.0, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर यासारखी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :