Moto G24 ची किंमत लाँचपूर्वी लीक! 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह मिळतील Best फीचर्स। Tech News 

 Moto G24 ची किंमत लाँचपूर्वी लीक! 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह मिळतील Best फीचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

अलीकडेच नवीन Moto G34 5G स्मार्टफोन भारतात लाँच

कंपनीचा आगामी Moto G24 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार

हा स्मार्टफोन देखील बजेट विभागात लाँच करण्यात येणार आहे.

Motorola ने अलीकडेच आपला नवीन Moto G34 5G फोन भारतात लाँच केला आहे. हा फोन 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह फक्त 10,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्वस्त 5G फोननंतर आता कंपनीच्या आणखी एका Moto G24 या आगामी स्मार्टफोनची बातमी आली आहे. हा स्मार्टफोन देखील बजेट विभागात लाँच करण्यात येणार आहे. Moto G24 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स बाजारात लॉन्च होण्याआधीच इंटरनेटवर लीक झाले आहेत. बघुयात तपशील-

हे सुद्धा वाचा: Best Offer! Realme GT Neo 3 वर मिळतेय तब्बल 20,500 रुपयांचा Discount, आश्चर्यकारक डील पुन्हा मिळणार नाही

MOTO G34 5G

Moto G24 ची लीक किंमत

Motorola G24 शी संबंधित हे लीक टिपस्टर सुधांशू यांनी दिले आहेत. टिपस्टरनुसार लीक झालेल्या रिपोर्टमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, हा मोबाईल फोन टेक मार्केटमध्ये 4GB RAM + 128GB स्टोरेजसह लाँच केला जाईल.

या फोनची किंमत EUR 169 अशी लीक झाली आहे. ही फोनची युरोपियन किंमत आहे जी भारतीय चलनानुसार सुमारे 15,299 रुपये आहे. मात्र, लीकमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, वेगवेगळ्या बाजारपेठेत फोनची किंमत वेगळी असेल. त्यामुळे, Moto G24 India ची किंमत 12 हजार ते 13 हजार दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Moto G24 चे लीक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

MOTO G34 5G

लीकनुसार Moto G24 फोन 6.56-इंच लांबीच्या HD+ पंच-होल डिस्प्लेवर लाँच केला जाईल. Moto G24 फोन उत्तम कार्यक्षमतेसाठी MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी असेल, जी 20W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

फोटोग्राफीसाठी Moto G24 मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकमध्ये असे दिसून आले आहे की, त्यात F/2.4 अपर्चरसह 50MP चा प्रायमरी सेन्सर असेल. त्याच्या मागील पॅनेलवर 2MP मॅक्रो लेन्स असेल. तसेच, लीकनुसार मोटोरोला स्मार्टफोन बाजारात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरासह सुसज्ज केला जाऊ शकतो, जो F/2.0 अपर्चरवर काम करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo