Moto G14 New Varients: 50MP कॅमेरासह दोन नव्या अवतारात येतोय स्मार्टफोन, कधी सुरु होणार सेल?

Moto G14 New Varients: 50MP कॅमेरासह दोन नव्या अवतारात येतोय स्मार्टफोन, कधी सुरु होणार सेल?
HIGHLIGHTS

Moto G14 स्मार्टफोन 24 ऑगस्ट रोजी फ्लिपकार्टवर अवतारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

नवीन कलर वेरिएंटसाठी Moto G14 चे स्पेसिफिकेशन सारखेच राहण्याची शक्यता

हा हँडसेट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या एकाच व्हेरिएंटमध्ये येतो.

Motorola ने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात Moto G14 बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यानंतर, फोनच्या रिलीजच्या काही दिवसांनंतर, कंपनी फोनच्या विद्यमान स्काय ब्लू आणि स्टील ग्रे कलर ऑप्शन्समध्ये नवीन रंग जोडत आहे. मोटोरोलाने त्याच्या X (ट्विटर) हँडलद्वारे घोषणा केली आहे की, G14 स्मार्टफोन 24 ऑगस्ट रोजी फ्लिपकार्टवर 'बटर क्रीम' आणि 'पेल लिलाक' शेडमध्ये देखील विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. बघुयात संपूर्ण तपशील. 

Moto G14 ची किंमत आणि उपलब्धता 

नवीन कलर वेरिएंटसाठी Moto G14 चे स्पेसिफिकेशन सारखेच राहण्याची शक्यता आहे.  स्मार्टफोनची किंमत Flipkart आणि Motorola च्या अधिकृत वेबसाइटवर 9,999 रुपये आहे. हा हँडसेट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. 

Moto G14 चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G14 मध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेट आणि 6.5-इंच लांबीचा FHD + IPS LCD डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेसह 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. Moto G14 ला Unisoc T616 CPU आणि Mali-G57 MP1 GPU मिळत आहे. हा हँडसेट Android 13 वर आधारित MyUX वर चालतो. त्याबरोबरच, इमर्सिव्ह मल्टीमीडिया पाहण्यासाठी, यात डॉल्बी ATMOS आणि मोटो स्पेशियल साउंड सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर आहेत. सिक्योरिटीसाठी, हा IP52-रेट केलेला फोन साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकसह येतो.

याव्यतिरिक्त तुम्हाला फोटोग्राफीसाठी, LED फ्लॅशसह 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 8MP फ्रंट लेन्स मिळत आहेत. प्रायमरी कॅमेरासह तुम्ही डीटेल्ड आणि शार्प इमेजेस घेऊ शकता. त्याच्या मागील कॅमेरामध्ये स्लो मोशन, ड्युअल टाइमलॅप्स, नाईट व्हिजन, लाइव्ह फिल्टर्स, प्रो, 4x पर्यंत डिजिटल झूम इत्यादी फीचर्सचा समावेश आहे.

याशिवाय, फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करेल आणि एका चार्जिंगवर संपूर्ण दिवस टिकू शकते. वेब सर्फिंग सारखी मूलभूत कार्ये करताना ही बॅटरी तब्बल दोन दिवस टिकू शकते. फोनच्या इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास,  कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, डिव्हाइस Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.0, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, मायक्रो SD कार्ड सपोर्ट (1TB पर्यंत) आणि डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंगसाठी टाइप-C पोर्टसह येतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo