Moto G14 Launch Date Confirm: नवीनतम स्वस्त स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, किंमत 10,000 अंतर्गत?

Moto G14 Launch Date Confirm: नवीनतम स्वस्त स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, किंमत 10,000 अंतर्गत?
HIGHLIGHTS

कंपनी लवकरच आपला नवीनतम बजेट स्मार्टफोन Moto G14 लाँच करणार आहे.

1 ऑगस्ट रोजी भारतात हा फोन लाँच होणार आहे.

लाँच अगोदर, फोनचे लँडिंग पेज फ्लिपकार्टवर समोर आले आहे.

प्रसिद्ध कंपनी Motorola अलीकडे सतत नवनवीन फोन लाँच करत आहे. ताजी बातमी म्हणजे कंपनी लवकरच आपला नवीनतम बजेट स्मार्टफोन Moto G14 लाँच करणार आहे. या फोनची लाँच डेट देखील कन्फर्म झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 1 ऑगस्ट रोजी भारतात फोन लाँच होणार आहे. लाँच अगोदर, फोनचे लँडिंग पेज फ्लिपकार्टवर समोर आले आहे, जे त्याच्या प्रमुख फीचर्स आणि डिझाइनची पुष्टी करते. लक्षात घ्या की, G14 Moto G13 चा सक्सेसरी असणार आहे. 

Moto G14 अपेक्षित भारतीय किंमत

 कंपनीने Moto G14 च्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे नवा फोन Moto G13 चा सक्सेसर आहे, ज्याची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली होती. त्यामुळे G14 ची किंमत देखील जवळपास समान असण्याची शक्यता आहे.

Moto G14 चे तपशील लीक्स 

डिस्प्ले आणि प्रोसेसर: 

Moto G14 मध्ये 6.5-इंच लांबीचा LCD FHD+ पंच-होल डिस्प्ले मिळेल. या डिवाइसला पॉवर देण्यासाठी यामध्ये Unisoc T612 चिपसेट दिला जाईल, ज्यामध्ये 4GB रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजचा सपोर्टही मिळेल. या चिपसेटसह युजरला डिव्हाइसवर मल्टीटास्कपासून ते अखंड गेमिंगपर्यंत एक प्रभावी मोबाइल एक्सपेरियन्स मिळेल. अतिरिक्त स्टोरेजचा विस्तार करण्यासाठी फोनमध्ये समर्पित मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील समाविष्ट करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. 

OS आणि बॅटरी: 

नवा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. फोनला Android 14 OS अपग्रेड आणि तीन वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट्स मिळतील. फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज असू शकतो, जो जलद पॉवर टॉप-अपसाठी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीचा दावा आहे की, या फोनला 34 तासांपर्यंतचा टॉकटाइम, 94 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम आणि 16 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक सपोर्ट मिळेल. 

साउंड आणि फोनची बॉडी: 

त्याबरोबरच, ऑडिओ G14 मध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स दिले जातील, ज्यांना डॉल्बी ATMOS तंत्रज्ञानाचा सपोर्ट मिळेल. डॉल्बी ATMOS ऑडिओ क्लॅरिटी, अधिक ऑडिओ आणि क्रिस्पर साउंड प्रदान करते. Moto G14 मध्ये IP52-रेट केलेली मजबूत बॉडी दिली जाईल, जी दैनंदिन वापरात पाणी आणि धुळीपासून डिवाइसचे संरक्षण करेल. हँडसेटच्या अधिकृत इमेजेसद्वारे पुष्टी झाली आहे की. फोन ब्लॅक आणि ब्लू शेडमध्ये सादर करण्यात येईल.

कॅमेरा: 

फोटोग्राफीसाठी Moto G14 50-मेगापिक्सेलच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येणार आहे, जे वापरकर्त्यांना हाय- कॉलिटी कॅप्चर करण्यास सक्षम करेल. हा फोन मॅक्रो व्हिजन आणि नाईट व्हिजन सारखे फोटोग्राफी फीचर्स देईल. याशिवाय, हे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह येईल, जे वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा देणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo