Moto G13 स्वस्त स्मार्टफोनची सेल अखेर सुरु, बघा स्मार्टफोनचे टॉप 5 फीचर्स

Moto G13  स्वस्त स्मार्टफोनची सेल अखेर सुरु, बघा स्मार्टफोनचे टॉप 5 फीचर्स
HIGHLIGHTS

Moto G13 ची सेल फ्लिपकार्टवर सुरु

स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये

3 वर्षांपर्यंत स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटी अपडेट दिले जातील.

अलीकडेच Moto G13 लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. आता या परवडणाऱ्या स्मार्टफोनची सेल सुरु झाली आहे. फ्लिपकार्टवर ही सेल आज 12 वाजतापासून सुरु करण्यात आली आहे. जर तुम्ही 10 हजार अंतर्गत नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. चला या फोनचे सर्व तपशील बघुयात- 

 Moto G13 ची किंमत 

Moto G13 ची किमंत फ्लिपकार्टवर 9,999 रुपये इतकी सूचिबद्ध झाली आहे. फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डवरून पेमेंट व्यवहार करण्यावर 5% कॅशबॅकदेखील दिला जाईल. 

बघुयात टॉप 5 फीचर्स 

डिस्प्ले : 

Moto G13 मध्ये 6.5 इंच लांबीचा 720p IPS LCD डिस्प्ले मिळेल. त्यासोबत 90Hz रिफ्रेश रेट आणि होल पंच कटआऊट दिला गेला आहे. मोटोरोलाने डिवाइस पांडा ग्लास स्क्रीन प्रोटेक्शन दिला गेला आहे. 

प्रोसेसर :  

 Moto G13 मीडियाटेक हेलिओ G85 चिपसेटने सुसज्ज आहे. यामध्ये, 4GB आणि 128GB स्टोरेज दिला गेला आहे. 

 परफॉर्मन्स : 

 Moto G13 स्टॉक अँड्रॉइड 13 वर काम करतो. मोटोरोला याला अँड्रॉइड 14 वर अपग्रेड करतो. 3 वर्षांपर्यंत  स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटी अपडेट दिले जातील. 

बॅटरी : 

Moto G13 स्मार्टफोन 10W USB C चार्जजिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळेल. 

कॅमेरा : 

Moto G13 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळत आहेत. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, 2MP मॅक्रो सेन्सर आणि पोट्रेट कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.   

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo