आगामी Moto G05 ची लाँच डेट Confirm! मिळेल 50MP Quad Pixel कॅमेरा, जाणून घ्या सर्व तपशील
आगामी Moto G05 स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेट कन्फर्म
लाँचपूर्वी या फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP क्वाड पिक्सेल कॅमेरा मिळेल.
Motorola चा आगामी Moto G05 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. दरम्यान, आता या फोनच्या लाँच तारखेची पुष्टी करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची विक्री इ-कॉमर्स साईट Flipkart द्वारे होणार आहे. एवढेच नाही तर, लाँचपूर्वी या फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipakart वर लाईव्ह झाली आहे. याद्वारे फोनचे डिझाईन आणि अनेक पॉवरफुल फीचर्स पुढे आले आहेत. चला पाहुयात Moto G05 चे भारतीय लॉन्चिंग तपशील आणि इतर तपशील-
Also Read: Price Drop! लेटेस्ट iPhone 16 Pro च्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या Best ऑफर्स
Moto G05 ची भारतीय लाँच डेट
Enjoy a stunning 6.67" with the new moto g05 90Hz display, Bass Boost stereo speakers, and 1000 nits brightness for perfect viewing even in sunlight.
— Motorola India (@motorolaindia) January 3, 2025
Launching on 7th January @Flipkart | https://t.co/azcEfy1Wlo | leading retail stores.#Motorola #MotoG05
वर सांगितल्याप्रमाणे, Moto G05 स्मार्टफोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, हा फोन 7 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय बाजारात लाँच केला जाईल. फ्लिपकार्टच्या सूचीवरून हे स्पष्ट झाले आहे की, या फोनची विक्री केवळ फ्लिपकार्टद्वारे होईल. फोनचे काही महत्त्वाचे स्पेक्स देखील या लिस्टिंगद्वारे उघड करण्यात आले आहेत या फोनमध्ये खरेदीसाठी ग्रीन आणि रेड कलर ऑप्शन्स उपलब्ध असतील.
Moto G05 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Flipkart लिस्टिंगद्वारे फोनचे डिझाईन पुढे आले आहे. फोनच्या मागील बाजूस व्हेगन लेदर डिझाइन दिसत आहे. या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असेल. तर, या फोनचे स्टोरेज अक्षरशः 12GB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 15 वर कार्य करेल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP क्वाड पिक्सेल कॅमेरा मिळेल. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Mediatek Helio G81 Extreme प्रोसेसरने सुसज्ज आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5200mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. जी एका चार्जवर 2 दिवस टाकण्याचा दावा आहे. या फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile