प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola चा Moto G04S स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे उपकरण भारतीय बाजारपेठेत Moto G04 ची अपग्रेडेड आवृत्ती म्हणून सादर करण्यात आले आहे. फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या नवीन उपकरणाची स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरी सारखे पॉवरफुल फीचर्स मिळतील. नवा Moto G04S बजेट रेंजमध्ये Redmi, Lava, itel आणि Realme सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्ससह जबरदस्त स्पर्धा करेल.
Also Read: Upcoming Smartphones in June 2024: ‘या’ महिन्यात भारतात लाँच होणार भारी स्मार्टफोन्स, बघा यादी
Moto G04S ची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत फोनचा 4GB+64GB स्टोरेज व्हेरिएंट मिळणार आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 5 जून 2024 पासून भारतात सुरु होणार आहे. हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून खरेदी करता येईल.
Moto G04S स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा पंच-होल डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz इतका आहे. डिस्प्ले सुरक्षेसाठी याच्या स्क्रीनवर गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन ग्लास बसवण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसर उपलब्ध आहे. या फोनची रॅम आणि स्टोरेज वाढवता येते. विशेष म्हणजे या मोबाईल फोनमध्ये मोशन जेश्चर देखील उपलब्ध आहेत. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, Wi-Fi, GPS, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोन ब्रँड Motorola ने Moto G04S मध्ये 50MP AI कॅमेरा दिला आहे. त्यासह LED लाईट उपलब्ध आहे. यामध्ये ऑटो नाईट व्हिजन आणि पोर्ट्रेट मोडसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 5MP कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे. यासह 102 तासांचा म्युझिक प्ले-बॅक टाइम आणि 22 तासांचा टॉकटाइम मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.