ह्या फोनला विराट फॅनबॉक्ससह लाँच केला गेला आहे आणि ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत १६,९९९ रुपये आहे.
मोटो G टर्बो एडिशनचा नवीन वेरियंट भारतात लाँच झाला आहे. ह्याला मोटो G टर्बो विराट कोहली एडिशन असे नाव देण्यात आले आहे. ह्या स्मार्टफोनमधील स्पेक्स जवळपास सारखेच आहेत, पण स्पेशल एडिशनमध्ये फोनच्या खालच्या बाजूस विराटचे एक एंब्लेम दिले आहे. त्याचबरोबर ह्या फोनला विराट फॅनबॉक्ससह लाँच केले गेेले आहे आणि ह्या दोघांचीही किंमत १६,९९९ रुपये आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, विराट फॅनबॉक्स मे च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल.
विराट फॅनबॉक्स एक वर्षाच्या विराट फॅनबॉक्स क्लबच्या सब्सक्रिप्शनसह आला आहे. ह्या पूर्ण बॉक्समध्ये एक छोटीशी बॅट आहे, ज्यावर विराटने साइन केले आहे. त्याचबरोबर ह्यासोबत तुम्हाला वेलकम लेटरसुद्धा मिळत आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत १२,४९९ रुपये आहे, मात्र ह्याआधी लाँचवेळी ह्याची किंमत १४,४९९ रुपये होती.
ह्या सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून आपल्याला विराटविषयी प्रत्येक बातमीविषयी माहिती मिळेल. त्याचबरोबर विराटला भेटण्याचा सुवर्णसंधीही मिळू शकते.