हा स्मार्टफोन ६४ बिट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसर, एड्रेनो 405GPU आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन मो़टो G टर्बो एडिशन मॅक्सिकोच्या बाजारात आणले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत 283 डॉलर ठेवण्यात आली आहे आणि १३ नोव्हेंबरला हा बाजारात उपलब्ध होईल.
जर मोटो G टर्बो एडिशनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ ने संरक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ६४बिट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर, एड्रेनो 405GPU आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डने वाढवू शकतो.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अॅपर्चर असलेला १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि f/2.2 अॅपर्चर असलेला ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 2470mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा मोटोरोला टर्बो पॉवर क्विक चार्जिंगला सपोर्ट करतो. हा हँडसेटसुद्धा IP67 सर्टिफाइड आहे, म्हणजेच हा वॉचर रेसिसटेंट आहे.
कनेक्टिव्हीटीसाठी ह्यात 4G LTE, वायफाय 802.11 B/G/N (2.4GHz), ब्लूटुथ 4.0 LE, 3G, GPS आणि मायक्रो-USB वैशिष्ट्य आहे.