200MP कॅमेरासह Motorola फोनची विक्री सुरु, बिग बिलियन डे सेलमध्ये मिळणार मोठी सूट
Moto Edge 30 Ultra आणि Moto Edge 30 Fusion ची विक्री सुरु झाली आहे
फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना हे दोन्ही फोन आज खरेदी करता येतील
फोनवर तीन हजार रुपयांपर्यंत सवलत मिळेल
200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या जगातील पहिल्या स्मार्टफोनची म्हणजेच Moto Edge 30 Ultraची विक्री सुरु झाली आहे. तसेच, आज Edge 30 Fusion देखील खरेदी करता येईल. आजपासून बिग बिलियन डे सेलमध्ये दोन्ही फोन फ्लिपकार्ट प्लस सदस्य खरेदी करू शकतात. Moto Edge 30 Ultra ची किंमत 59,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये तो 3 हजार रुपयांच्या सूटसह मिळेल. कंपनी Moto Edge 30 Fusion वर 3,000 रुपयांची सूट देखील देत आहे. डिस्काउंटनंतर हा फोन अनुक्रमे 42,999 रुपयांऐवजी 39,999 रुपयांना मिळेल.3 हजार रुपयांच्या सवलतीसाठी, तुम्हाला ICICI किंवा Axis Bank कार्डद्वारे व्यवहार करावे लागेल.
हे सुद्धा वाचा : Samsung Sale : स्मार्टफोनसोबत, तुम्हाला TV वरही मिळेल भरघोस सूट, जाणून घ्या सर्व ऑफर
Moto Edge 30 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये, कंपनी 144Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा फुल HD + POLED डिस्प्ले देत आहे. HDR10+ ला सपोर्ट करणाऱ्या या फोनची पीक ब्राइटनेस लेव्हल 1250 nits आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील आहे. फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज ऑप्शनम्हद्ये येतो. प्रोसेसर म्हणून, तुम्हाला त्यात Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट मिळेल.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 200-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससह 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 12-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 60-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
Moto Edge 30 Fusion चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनी या फोनमध्ये 6.55 इंच डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रीफ्रेश रेट आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग दरासह येतो. 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज असलेला हा फोन स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी तुम्हाला यात 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये दिलेली बॅटरी 4400mAh आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile