डुअल कॅमेरा असेलला MOTO E6S झाला लॉन्च, किंमत आहे RS 7,999

डुअल कॅमेरा असेलला MOTO E6S झाला लॉन्च, किंमत आहे RS 7,999
HIGHLIGHTS

Flipkart वर केला जाईल सेल

23 सप्टेंबरला सुरु होईल सेल

Motorola ने भारतात आपला Moto E6s स्मार्टफोन लॉन्च केला आहे आणि Smartphone ची किंमत 7,999 रूपये ठेवण्यात आली आहे. डिवाइसचा पहिला सेल फ्लिप्कार्ट वर 23 सप्टेंबरला सुरु होईल. स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा, फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स मिळत आहेत. चला जाणून घेऊया स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशंस बद्दल…

Moto E6s Specifications

Moto E6s मोबाइल फोन मध्ये 6.1 इंचाचा HD+ मॅक्स वजन डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा डिस्प्ले 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो ऑफर करतो. स्मार्टफोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एक 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. कॅमेरा ऍप मध्ये बोकेह मोड आणि लँडस्केप मोड पण देण्यात आला आहे. सेल्फी लवर्स साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्मार्टफोन स्टॉक एंड्राइड सह आला आहे आणि हा ब्लॉट फ्री आणि ऍड फ्री सॉफ्टवेयर आहे. तसेच डिवाइस मध्ये मीडियाटेक हीलियो P22 SoC आहे. स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रो SD कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते.

डिवाइस मध्ये सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे आणि सोबतच फोन रिमूवेबल बॅक कवर आणि बॅटरी सह आला आहे. कंपनीनुसार, लवकरच फ्लिप्कार्ट वर डिवाइसचे बॅक कवर्स वेगवेगळ्या डीजाइन सह सादर केले जातील. फोन रिच क्रेनबेरी आणि पोलिश्ड ग्रेफाइट कलर मध्ये विकत घेता येईल.

Moto E6s Price

Moto E6s ची किंमत Rs 7,999 ठेवण्यात आली आहे आणि डिवाइसचा पहिला सेल Flipkart वर 23 सप्टेंबरला सुरु होईल तसेच फोन सोबत जियो यूजर्स 2200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक पण मिळवू शक्यता. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo