लेनोवो ने चालू मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 मध्ये कोणतेही स्मार्टफोंस सादर नाही केले. पण आता Evan Blass ने एक रेंडर ट्वीट केला आहे आणि तो Moto E5 Plus चा असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून या फोनची बनावट आणि डिजाइन याबाबत माहिती मिळते. ही इमेज निरखून बघितल्यावर समजत आहे की या फोन मध्ये डिस्प्ले चे किनारे बारीक आहेत. मोटोरोला ची ब्रांडिंग डिस्प्ले च्या खाली देण्यात आली आहे. डिस्प्ले च्या वर वरच्या बाजूचा किनारा खालच्या बाजूच्या किनाऱ्याच्या तुलनेने बारीक आहे.
या फोन चा मागचा भाग मागे लाँच झालेल्या Moto X4 शी मिळता जुळता आहे. या रेंडर वर विश्वास ठेवल्यास या फोन मध्ये ग्लास बॅक बरोबर डुअल कॅमेरा मोड्युल पण असेल, जसा Moto X4 मध्ये देण्यात आला आहे.
या सोबत या फोन मध्ये 3.5mm ऑडियो जॅक पण असू शकतो, जो फोनच्या टॉप एज वर आहे. हा एका माइक्रो-USB चार्जिंग पोर्ट सह येऊ शकतो जो फोनच्या खालच्या बाजूस असेल.