गीकबेंच वर दिसला Motorola चा Moto E5 Plus स्मार्टफोन

Updated on 13-Apr-2018
HIGHLIGHTS

Motorola Moto E5 Plus ला गीकबेंच टेस्ट च्या मल्टी-स्कोर टेस्ट मध्ये 1835 पॉइंट्स आणि सिंगल-कोर टेस्ट मध्ये 653 पॉइंट्स मिळाले आहेत.

Motorola 19 एप्रिलला होणार्‍या लॉन्च इवेंट मध्ये आपले नवीन बजेट स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे. या लॉन्च इवेंट मधे Moto G6 सीरीज स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील. या लॉन्च इवेंट च्या आधी गीकबेंच वर Moto E5 Plus दिसला आहे. 
Moto E5 Plus आगामी Moto E5-सीरीज चा टॉप-एंड मॉडल आहे, जो कंपनी च्या एंट्री लेवल स्मार्टफोन्स ची लाइनअप आहे. गीकबेंच लिस्टिंग वरून E5 Plus च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती मिळाली आहे, जी आधी आलेल्या लीक्स सोबत मिळतीजुळती आहे.  
Motorola Moto E5 Plus ला गीकबेंच टेस्ट च्या मल्टी-स्कोर टेस्ट मध्ये 1835 पॉइंट्स आणि सिंगल-कोर टेस्ट मध्ये 653 पॉइंट्स मिळाले आहेत. हा फोन स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर वर चालतो जो दैनंदिन कामांसाठी खुप चांगला आहे आणि या डिवाइस मध्ये 3GB रॅम आहे. 
दुसर्‍या रिपोर्ट नुसार, Moto E5 Plus स्मार्टफोन मध्ये फुल स्क्रीन डिस्प्ले असेल ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 असेल. या डिवाइसला 3D ग्लास डिझाइन दिला जाईल आणि यात एक मोठी बॅटरी असेल. लीक्स नुसार Moto E5 Plus मध्ये 5.8 इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल जो HD+ 720 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन ऑफर करेल. हा स्मार्टफोन दो स्टोरेज विकल्पांमध्ये सादर केला जाऊ शकतो, याच्या एक वेरिएंट मध्ये 32GB आणि दुसर्‍या वेरिएंट मध्ये 64GB स्टोरेज आहे. 

डिवाइस च्या मागे 16 मेगापिक्सल चा कॅमेरा असेल जो f/1.75 अपर्चर सह येईल आणि सेल्फी साठी हा डिवाइस 8 मेगापिक्सल चा कॅमेरा ऑफर करेल जो f/2.0 अपर्चर सह येईल. हा स्मार्टफोन 5,000mAh च्या मोठ्या बॅटरी सह येईल. 
कंपनी ने 19 एप्रिलला होणाऱ्या लॉन्च इवेंट मध्ये Moto G6 सीरीज चे Moto G6, G6 Plus आणि G6 Play स्मार्टफोन लॉन्च करू शकते आणि आशा आहे की कंपनी आपली Moto E5 सीरीज पण सादर करेल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :