मोटोरोला आता आपल्या सीरीज ला एक्सपांड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामुळे Moto E5 आणि Moto G6 ला आणण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे मार्केट मध्ये मोटो चे नवीन मॉडेल दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. Moto E5 आणि Moto G6 स्मार्टफोन ला आवश्यक सर्टिफिकेशन मिळाले आहेत, ज्याचा अर्थ असा होतो की Moto E5 आणि Moto G6 च्या अनावरण आता जास्त दुर नाही.
अपेक्षा आहे की Moto E5 आणि Moto G6 मिड रेंज बजेट फोंस असतिल. त्यामुळे या सेगमेंट मध्ये येणार्या दिवसांमध्ये स्पर्धा वाढेल, कारण मोटो व्यतिरिक्त अन्य काही फोन निर्माता पण या रेंज मध्ये आपले नवीन फोंस लॉन्च करणार आहेत.
मोटोरोला ची आगामी काळात प्रीमियम मॉडेल पण आणण्याची
योजना आहे. तज्ञांचें म्हणणे आहे की कंपनी हे मॉडेल्स MWC 2018 मध्ये दाखवणार होती पण मग त्यांनी आपली योजना बदलली. काही रिपोर्टस नुसार, कंपनी जगातील दुसर्या भागांमध्ये उतरवण्याचा आधी दक्षिण पूर्व आशिया मध्ये हे मॉडेल आणू शकते.
Moto G6 सीरीज अंतर्गत 3 मॉडल येऊ शकतात, जे Moto G6, Moto G6 Plus आणि Moto Play असे असू शकतात. Moto G6 मध्ये फुल HD+ डिस्प्ले आणि 5.7 इंच स्क्रीन असण्याची शक्यता आहे. हा फोन मेटल बॉडी असलेल्या आकर्षक डिजाइन सह येऊ शकतो.
यात 3G ग्लास रियर पॅनल आणि स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर असू शकतो. हा फोन 4GB रॅम/64GB इंटरनल स्टोरेज आणि 3GB रॅम/32GB इंटरनल स्टोरेज च्या 2 वेरियंट मध्ये येऊ शकतो. फोन ची बॅटरी 3000mAh असू शकते आणि यात 12MP आणि 5MP चा डुअल रियर कॅमेरा असू शकतो.
जर Moto G6 Plus बद्दल बोलायाचे झाले तर हा फोन 5.93 इंचाच्या स्क्रीन सह येऊ शकतो. फोन चा कॅमेरा Moto G6 प्रमाणे असेल पण बॅटरी 3200mAh ची असू शकते. मोटो या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर आणू शकतो. तर, Moto G6 Play मध्ये 5.7 इंच स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर असू शकतो.
Moto E5 सीरीज G6 सीरीज प्रमाणे 3 मॉडल मध्ये येऊ शकते, यात पण एक प्लस आणि एक प्ले एडिशन लॉन्च होऊ शकतो. Moto E5 स्मार्टफोन मध्ये 5.5 इंच स्क्रीन असू शकते, तर Moto E5 Plus मध्ये 5.8 इंचाची HD+ स्क्रीन असण्याची शक्यता आहे. तर, Moto E5 Play मध्ये 5.2 इंचाची एचडी स्क्रीन अपेक्षित आहे. पण या स्पेसिफिकेशन बद्दल कंपनी ने अजूनतरी अधिकृतपणे काही स्पष्टीकरण दिले नाही.