मोटोरोलाने मोटो E3 स्मार्टफोनला बाजारात लाँच केले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले सुद्धा आहे. अमेरिकेत ह्याची किंमत १३१ डॉलर (८९०० रुपये) ठेवण्यात आली आहे. बाजारात ह्या स्मार्टफोनचा सामना सॅमसंग गॅलेक्सी ऑन 5 प्रो, लेनोवो वाइब K5 प्लस, इंटेक्स अॅक्वा व्ह्यू सारख्या फोन्सशी होईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची IPS HD डिस्प्ले दिली आहे, ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720 पिक्सेल आहे. हा फोन क्वाड-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
हेदेखील वाचा – भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…
ह्या स्मार्टफोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा 2800mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ, GPS सारखे फिचर्स दिले आहे.
हा स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल, मात्र हा फोन भारतात कधी लाँच केला जाईल, ह्याबाबत कंपनीने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
हेदेखील वाचा – आयफोन 7, 7 प्लस, 7 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा
हेदेखील वाचा – लेनोवो वाइब C2 स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ने सुसज्ज