MOTOROLA ने लाँच केला कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन, 5000mAh ची बॅटरीसह मिळतील उत्तम फीचर्स

MOTOROLA ने लाँच केला कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन, 5000mAh ची बॅटरीसह मिळतील उत्तम फीचर्स
HIGHLIGHTS

बजेट सेगमेंटमध्ये Motorola E22s स्मार्टफोन लाँच

नव्या स्मार्टफोनची किंमत सुमारे 12,680 रुपये

स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे.

Motorola ने आपल्या स्मार्टफोनची रेंज वाढवत नवीन हँडसेट Moto E22s बाजारात आणला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट फोन अनेक उत्तमोत्तम फीचर्सने सुसज्ज आहे. Moto G22s मध्ये कंपनी 90Hz चा रीफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरी  देत आहे. Motorola ने नुकताच हा फोन युरोपमध्ये लॉन्च केला आहे. इको ब्लॅक आणि आर्क्टिक ब्लू कलर ऑप्शन्समध्ये येणाऱ्या या फोनची किंमत 159 युरो म्हणजेच सुमारे 12,680 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा : 5 सप्टेंबरला लाँच होणार Poco M5, लॉन्च होण्यापूर्वीच फ्लिपकार्टवर पेज लाइव्ह, जाणून घ्या फीचर्स

Moto E22s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये, कंपनी 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच लांबीचा IPS LCD पॅनेल देत आहे. फोनमधील हा डिस्प्ले पंच-होल डिझाइनसह येतो. डिस्प्लेची खास गोष्ट म्हणजे हा 90Hz च्या रिफ्रेश रेटलाही सपोर्ट करतो. मोटोचा हा बजेट स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Helio G37 चिपसेट देत आहे.

moto e22s

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 16-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर हा Moto फोन Android 12 वर काम करतो. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉक फिचरसह, Moto G22s ला 5000mAh बॅटरी सपोर्ट आहे. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo