Motorola ने बुधवारी भारतात एंट्री-लेव्हल Moto E13 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन 6,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आणि 23 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक सपोर्ट आहे. चला जाणून घेऊया फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स…
हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! OnePlus 11R कमी किमतीत लाँच, जाणून घ्या किमंत आणि जबरदस्त स्पेक्स
Moto E13 मध्ये Dual nanosim सपोर्ट आणि Android 13 (Go Edition) देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD Plus IPS LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये 4 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज ऑक्टा-कोर Unisoc T606 प्रोसेसर आणि Mali-G57 MP1 GPU सह मिळते. मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येते.
फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 10W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की फोन एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर, व्हिडिओ प्लेबॅक वेळ 23 तासांपर्यंत आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi – Fi, ब्लूटूथ 5.0, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक समर्थित आहेत.
याव्यतिरिक्त, यात 13-मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरा युनिट 30fps वर फुल-HD व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहेत.
Moto चा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. 64 GB स्टोरेज सह 2 GB RAM ची किंमत 6,999 रुपये आणि 64 GB स्टोरेज सह 4 GB RAM ची किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि जिओमार्ट वरून खरेदी करता येईल. सध्याच्या आणि नवीन Jio ग्राहकांना फोनच्या खरेदीवर 700 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. नवा फोन अरोरा ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक आणि क्रीमी व्हाइट रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.