Moto E13 बजेट स्मार्टफोनची पहिली विक्री आज, सुरुवातीची किंमत फक्त 6,999 रुपये

Updated on 24-Mar-2023
HIGHLIGHTS

Moto E13 स्मार्टफोनची पहिली सेल आज

कंपनीचा दावा आहे की, एका चार्जवर स्मार्टफोनची बॅटरी 36 तास टिकेल.

स्मार्टफोनच्या 2 GB RAM / 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये

हँडसेट निर्माता Motorola ने गेल्या आठवड्यात ग्राहकांसाठी आपला नवीन बजेट स्मार्टफोन Moto E13 लाँच केला. त्यानंतर, आज म्हणजेच 15 फेब्रुवारीपासून या Motorola मोबाईल फोनची विक्री Flipkart वर सुरू होत आहे. सेल सुरू होण्यापूर्वी फोनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात… 

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्रातील दोन नव्या शहरांमध्ये पोहोचली JIO 5G सेवा, ग्राहकांना मिळेल वेलकम ऑफर

किंमत आणि ऑफर्स

या Motorola स्मार्टफोनच्या 2 GB RAM / 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे. तर, 4 जीबी रॅम / 64 जीबी वेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. पण Jio एक्सक्लुझिव्ह ऑफरचा फायदा घेऊन फ्लॅट 700 रुपयांचा कॅशबॅक मिळाल्यानंतर, या फोनची किंमत 6,299 रुपये आणि 7,299 रुपये असेल.

HSBC, IndusInd आणि OneCard क्रेडिट कार्ड आणि फोनसह EMI व्यवहारांवर 10 टक्के म्हणेजच 1000 रुपयांपर्यंत सूट असेल. तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5 टक्के कॅशबॅक आणि 247 रुपये प्रति महिना EMI ची सुविधा देखील मिळेल.

Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स

 फोनमध्ये 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले आहे जो HD Plus रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. Moto E13 ने युनिसॉक T606 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU समाकलित केले आहे.

Motorola ब्रँडच्या या फोनमध्ये 13MP रियर सेन्सर आणि 5MP सेल्फी कॅमेरा आहे. 5000 mAh बॅटरी फोनला जीवदान देण्याचे काम करते, जी 10 W चार्जिंगला सपोर्ट करते. फोन टाइप-सी चार्जिंग पोर्टसह येतो, कंपनीचा दावा आहे की एका चार्जवर बॅटरी 36 तास टिकेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :