जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून फ्लिपकार्टवर Moto Days सेल सुरू झाला आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही मोटोरोलाचे स्मार्टफोन जबरदस्त ऑफर आणि बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या सेलदरम्यान तुम्ही तुमचा आवडता मोटोरोला स्मार्टफोन ही उत्तम एक्सचेंज बोनससह खरेदी करू शकता. खास गोष्ट म्हणजे 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला सेल फोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा असू शकतो.
हे सुद्धा वाचा : अरे बापरे ! अमर्यादित डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स आज होणार बंद, त्वरित रिचार्ज करा…
हा मोटोरोला फोन 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये येतो. त्याची MRP 21,999 रुपये आहे. सेलमध्ये हे 14,999 रुपयांना दिले जात आहे. कंपनी फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डवर 5% कॅशबॅक देखील देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 14 हजार रुपयांपर्यंतचा फायदाही होऊ शकतो. 6000mAh बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 34,999 रुपये आहे. तुम्ही सेलमध्ये 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी Flipart Axis Bank कार्ड वापरल्यास, तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. कंपनी फोनवर 22,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत आहे. तुम्हाला एक्सचेंजमध्ये काही मॉडेल्सवर 5,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा देखील मिळू शकतो. या फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.
6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 16,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये हा तुमचा 11,999 रुपयांचा असेल. तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असल्यास, तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. फोनवर दिलेला एक्सचेंज बोनस 11,050 रुपयांपर्यंत आहे. Motorola चा हा बजेट फोन 50-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
Motorolaच्या या फोनची MRP 10,999 रुपये आहे. तुम्ही ते 8,599 रुपयांना सेलमध्ये खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank कार्डधारकांना 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेजसह या फोनवर 5% कॅशबॅक देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. तुम्हाला या फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा पाहायला मिळेल. याशिवाय कंपनी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि Unisoc T700 प्रोसेसर देखील देत आहे.