How to: उन्हाळ्यात तुमचा Smartphone गरम होण्याची देखील समस्या आहे का? बघा 5 सोप्या टिप्स। Tech News

Updated on 03-May-2024
HIGHLIGHTS

उन्हाळ्यात Smartphone गरम होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात होते.

ब्लूटूथ ऑन असतानाही तुमचा फोन गरम होण्याची समस्या येते.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला या समस्येसाठी काही टिप्स सांगणार आहोत.

जवळपास प्रत्येकच स्मार्टफोन युजर्सना उन्हाळ्यात Smartphone गरम होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात होते. आपणा सर्वांनाच माहिती आहे की, वाढलेला तापमान केवळ आपल्या मानवी शरीरावरच नाही तर तुमच्या गॅजेट्स आणि डिवाइसवरही परिणाम करतो. जर तुमचा स्मार्टफोन वारंवार गरम होत असेल तर काळजी करू नका. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला या समस्येसाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुमचा फोन लगेच थंड होईल.

फोनची ब्राइटनेस कमी ठेवा.

आजकाल स्मार्टफोन जास्तीत जास्त ब्राइटनेससह येतात. त्यामुळे कधी कधी चांगल्या दृश्यमानतेसाठी तुम्ही अनेकदा तुमच्या फोनचा ब्राइटनेस पूर्ण वाढवला तरीही, तुमचा फोन लवकर गरम होण्याची समस्या येते. उन्हाळ्यात जास्त ब्राइटनेसमुळे फोन गरम होतो, अशा परिस्थितीत फोन थंड होण्यासाठी फोनचा ब्राइटनेस लगेच कमी करणे उत्तम राहील.

ब्लूटूथ ऑफ करा.

काही वेळा ब्लूटूथ चालू असतानाही तुमचा फोन गरम होण्याची समस्या येते. ब्लूटूथ ऑन असतानाही फोन नेहमी बॅकग्राउंडमध्ये स्कॅन करत राहतो, ज्यामुळे कोणतेही नवीन डिव्हाइस ब्लूटूथद्वारे फोनशी कनेक्ट होऊ शकते. त्यामुळे तुमचा फोन गरम होऊ नये म्हणून काम झाल्यास ब्लूटूथ ऑफ करा.

इतर गॅजेट्स आणि डिवाइसपासून दूर ठेवा.

तुम्ही एकाच वेळी अनेक उपकरणांसह फोन ठेवला तरीही फोन गरम होतो. अशा परिस्थितीत फोनला इतर गॅजेट्सपासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याबरोबरच, फोन चार्ज झाल्यावरही अधिक वेळ फोन चार्जिंगवर ठेऊ नका. चार्जिंगवर असताना फोनकडे लक्ष ठेवणे, आवश्यक आहे.

Airplane Mode ऑन करा.

अनेक वेळा असे ॲप्स बॅकग्राउंडमध्ये सुरु राहतात, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसते. यामुळे फोन खूप गरम होतो. जर वरील सर्व टिप्स फॉलो करूनही तुमचा फोन थंड होत नसेल, तर लगेच फोनचा Airplane Mode ऑन करा. Airplane Mode ऑन करताच, फोन काही मिनिटांतच सामान्य होईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :