Realme 11 Pro 5G सिरीज अखेर भारतात लाँच झाली आहे. या फ्लॅगशिप सीरीज अंतर्गत, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. मागील महिन्यात चीनमध्ये ही सिरीज लाँच झाली होती. हे स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह आणले गेले आहेत. ही सिरीज ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सूचीबद्ध आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, फोनची अर्ली ऍक्सेस सेल आज संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत असेल. स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर 9 जूनपासून सुरू होतील. अर्ली ऍक्सेस सेल दरम्यान, ग्राहकांना HDFC आणि SBI बँक कार्डवर 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
Realme 11 Pro 5G फोन 6.7-इंच लांबीच्या फुल HD+ AMOLED डिस्प्लेसह येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर दिला जाईल. हा फोन Android 13 आधारित RealmeUI 4.0 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी, यात 100MP प्राथमिक कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
Realme 11 Pro + मध्ये डिस्प्ले आणि प्रोसेसर वरील फोन प्रमाणे आहे. प्रोसेसर जास्तीत जास्त 12GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध असेल. हा फोन Android 13 आधारित RealmeUI 4.0 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा दुसरा, 2MP चा तिसरा कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे.
यात तुम्हाला प्रायमरी कॅमेरा झूम सपोर्ट आणि मून मोडसह मिळणार आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
https://twitter.com/realmeIndia/status/1666710995350466566?ref_src=twsrc%5Etfw
Realme 11 Pro 5G सिरीजमध्ये Realme 11 Pro Plus 5G ची किमंत 27,999 पासून सुरू होते. तर, Realme 11 Pro 5G ची सुरुवातीची किमंत 23,999 रुपये इतकी आहे.