Finally! आगामी OnePlus 13 ची प्रतीक्षा संपली! अखेर फोनचे भारतीय लाँच Confirm, पहा डिटेल्स 

Finally! आगामी OnePlus 13 ची प्रतीक्षा संपली! अखेर फोनचे भारतीय लाँच Confirm, पहा डिटेल्स 
HIGHLIGHTS

अखेर कंपनीने OnePlus 13 फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली.

OnePlus India ने त्याच्या अधिकृत X हँडलवर एक टीझर व्हिडिओ शेअर केला.

OnePlus 13 ची समर्पित मायक्रोसाइट देखील OnePlus India साइटवर लाईव्ह

OnePlus 13 India Launch: प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus च्या आगामी OnePlus 13 या नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोनची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून टेक विश्वात सुरु आहे. हा स्मार्टफोन आधीच चीनच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. दरम्यान, आता अखेर कंपनीने या फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. तसेच, या फोनसाठी एक समर्पित मायक्रोसाइट OnePlus India च्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह केली गेली आहे. या साईटच्या माध्यमातून फोनचा पहिला अधिकृत लूक समोर आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात आगामी OnePlus 13 चे भारतीय लॉन्चिंग तपशील-

Also Read: OnePlus 12R Discount: लोकप्रिय स्मार्टफोनवर Amazon देतोय तब्बल 5000 रुपयांची सूट, पहा ऑफर

OnePlus 13 चे भारतीय लाँच

प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus India ने त्याच्या अधिकृत X हँडलवर एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये कंपनीने आपल्या 11 वर्षांच्या प्रवासाची झलक दाखवली आहे. यासह, नवीन OnePlus 13 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी देखील करण्यात आली आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकमध्ये हा टिझर व्हीडिओ पाहू शकता.

वर सांगितल्याप्रमाणे, यासह, कंपनीने OnePlus 13 ची समर्पित मायक्रोसाइट देखील OnePlus India साइटवर थेट केली आहे. हा फोन मिडनाईट ओशन, ब्लॅक एक्लिप्स आणि आर्क्टिक डॉन या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. लक्षात घ्या की, सध्या OnePlus 13 फोनच्या लाँच डेटचा खुलासा कंपनीने केलेला नाही. मात्र, कंपनी पुढील वर्षी जानेवारी 2025 मध्ये हा स्मार्टफोन लाँच करणार आहे, असे म्हटले जात आहे.

OnePlus 13 चे तपशील

oneplus 13 india launch confirm

वर सांगितल्याप्रमाणे, OnePlus 13 आधीच चिनी मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, OnePlus 13 फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज असेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 24GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा, 50MP 3X पेरिस्कोप सेन्सर आहे, ज्यासह OIS सपोर्ट मिळेल. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. तसेच, फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यामध्ये 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo