हा फोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देखील उपलब्ध आहे.
मागील काही काळापासून आगामी OnePlus 12 ची टेक विश्वात सर्वत्र चर्चा सुरु होती. आता अखेर फ्लॅगशिप किलरने OnePlus 12 लाँच केला आहे. कंपनीने OnePlus 12 फोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे. हा फोन OnePlus 11 5G चा अपग्रेडेड वर्जन आहे. हा OnePlus फोन 2K डिस्प्लेसह येतो. याशिवाय, हा फोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
OnePlus 12 किंमत
OnePlus 12 च्या 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 4299 युआन म्हणजेच अंदाजे 50,650 रुपये आहे. यामध्ये 16GB + 512GB मॉडेल देखील आहे, ज्याची किंमत 4799 युआन म्हणजेच अंदाजे 56,465 रुपये आहे.
तर, 16GB + 1TB ची किंमत 5299 युआन म्हणजेच अंदाजे 62,440 रुपये आहे. त्याबरोबरच, 24GB + 1TB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5799 युआन म्हणजेच अंदाजे 68,335 रुपये आहे.
OnePlus 12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीने OnePlus 12 फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा Quad HD+ कर्व डिस्प्ले दिला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा OnePlus फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज असेल, ज्यामध्ये 12GB, 16GB, 24GB LPDDR5X रॅम आणि 256GB, 512GB आणि 1TB (UFS 4.0) स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. फोन Android 14 आधारित ColorOS 14 वर काम करतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये, 50MP Sony LYT प्रायमरी कॅमेरा आहे. हे 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 64MP टेलिफोटो लेन्ससह प्रदान केले आहे, ज्यासह 3X ऑप्टिकल झूम समर्थित आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5400mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.