बहुप्रतीक्षित Motorola Razr 40 सिरीज अखेर लाँच, आकर्षक सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध
Motorola Razr 40 सिरीज 1 जून रोजी लाँच
सिरीज अंतर्गत Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra हे दोन स्मार्टफोन मॉडेल सादर
दोन्ही फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध
Motorola Razr 40 सिरीज लाँच झाली आहे. या सिरीजमध्ये Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra हे दोन स्मार्टफोन मॉडेल आहेत. हा कंपनीचा नवीनतम फ्लिप फोन आहे. या फोनसह तुम्हाला आकर्षक सेल्फी घेता येणार आहे, म्हणजेच यातील कॅमेरा फिचर्स सर्वोत्तम आहेत. बघुयात किंमत, फीचर्स आणि स्पेक्स –
Motorola Razr 40 सिरीजची किंमत
खरं सांगायचे झाले तर, ही सिरीज सध्या लाँच झाली आहे. फोनच्या 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5699 युआन म्हणजेच जवळपास 66,080 रुपये आहे. तसेच, फोनच्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 6499 युआन म्हणजेच सुमारे 75,300 रुपये आहे. दुसरीकडे, Motorola Razr 40 ची किंमत 3,999 युआन म्हणजेच सुमारे 46,367 रुपयांपासून सुरू होईल.
Motorola Razr 40
Motorola Razr 40 फोनमध्ये 6.9-इंच लांबीचा प्रायमरी FHD + OLED LTPO डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. यासह, फोनमध्ये 1.5 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देखील आहे. याशिवाय, हा फोन Octa Core Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळणार आहे.
यात OIS सपोर्टसह 64MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 4,200mAh बॅटरी आहे, जी 33W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Motorola Razr 40 Ultra
Motorola Razr 40 Ultra फोनमध्ये 6.9-इंच लांबीचा प्रायमरी FHD + OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. यासह, फोनमध्ये 3.5-इंच लांबीचा कव्हर OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. हा फोन Octa Core Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन देखील Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ज्यामध्ये 12GB LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज उपलब्ध आहे.
यात OIS सपोर्टसह 12MP प्रायमरी कॅमेरा आहे आणि 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील OIS सह समर्थित आहे. तसेच, 32MP सेल्फी कॅमेरा तुम्हाला या फोनमध्ये देखील मिळेल. फोनमध्ये 3,800mAh बॅटरी आहे, जी 33W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile