मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2018 सुरू होण्यास थोडाच वेळ उरला आहे आणि आम्ही वेगवेगळ्या कंपन्या नवीन स्मार्टफोंस सादर करतील अशी आशा करत आहोत. असुस ZenFone 5 च्या नावा अंतर्गत एक इवेंट मध्ये आपले नवीन स्मार्टफोंस सादर करेल आणि कंपनी ने या इवेंट साठी इनवाइट्स पण पाठवले आहेत, ज्यांना “वी लव फोटो” मोनिकर सह पाठवण्यात आले आहेत. असुस चा हा इवेंट 27 फेब्रुवारीला होईल.
Asus ZenFone 5
मागच्या रिपोर्ट नुसार, असुस आपल्या ZenFone 5 स्मार्टफोन साठी अॅप्पल च्या iPhone X ला कॉपी करू शकतो. मागेच हा स्मार्टफोन एका फोटो मध्ये लीक झाला होता, ज्यात ह्या डिवाइस मध्ये iPhone X प्रमाणे डिस्प्ले च्या टॉप वर असलेला नॉच दिसला होता तसेच ह्या डिवाइस मध्ये बारीक बेजल असलेली डिजाइन असेल. हा फोटो मॅन्युफॅक्चरर कडून आल्याचा दावा करण्यात आला होता, जर ह्या लीक वर विश्वास ठेवला तर या नॉच मध्ये सेंसर, कॅमेरा आणि एक इयरपीस असण्याची शक्यता आहे.
Asus ZenFone 5 मध्ये 5.7 इंचाचा 18:9 एस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले असेल. हा डिवाइस एंड्राइड ओरियो सह लॉन्च होऊ शकतो आणि सोबतच ह्या डिवाइस मध्ये डुअल रियर कॅमेरा, माइक्रो USB पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल. लीक नुसार, ह्या डिवाइस च्या फ्रंटला कोणतेही फिजिकल बटन नसेल आणि हा डिवाइस रियर फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल. फोनच्या उजव्या बाजूस पॉवर बटन आणि वॉल्युम रॉकर कीज असतिल. मागच्या रेंडर वरून कळत आहे की हा डिवाइस वर्टिकल डुअल कॅमेरा सेटअप सह येईल.
Asus ZenFone 5 Lite
ZenFone 5 Lite स्मार्टफोन ZenFone 5 चा छोटा वेरिएंट असेल. हा डिवाइस Evan Blass ने तीन कलर वेरिएन्ट्स मिडनाइट ब्लॅक, मूनलाइट वाइट आणि रूज रेड मध्ये लीक केला होता. Evan Blass ने मागच्या प्रेस रेंडर वरून दावा केला होता कि हा डिवाइस फ्रंट आणि रियर दोन्ही पॅनल वर डुअल सेंसर सह क्वॉड कॅमेरा सेटअप सह येईल.
ह्या डिवाइस च्या बाबतीत आलेले आधीच्या लीक नुसार ह्या डिवाइस मध्ये 20MP डुअल फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल आणि याच्या मागच्या बाजूस 16MP+16MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. आतापर्यंत याच्या प्रोसेसर बद्दल काही माहिती मिळाली नाही, पण आशा आहे की हा डिवाइस 6 इंचाच्या FHD+ डिस्प्ले सह येईल ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 असेल.
Asus ZenFone 5 सीरीज फोन एंड्राइड ओरियो (गो एडिशन) वर चालणारा आहे?
असुस एंट्री-लेवल स्मार्टफोन वर काम करू शकते जो एंड्राइड ओरियो (गो एडिशन) OS वर चालेल. ASUS_X00QD मॉडल नंबर चा एक डिवाइस गीकबेंच वर दिसला होता आणि याच्या स्पेसिफिकेशन्स नुसार, हा डिवाइस एंड्राइड ओरियो (गो एडिशन) हाँडसेट आहे आणि ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 425 SoC, 1GB रॅम असेल आणि हा एंड्राइड 8.1 ओरियो वर चालेल.
मॉडल नंबर ASUS_X00QD सह Asus ZenFone 5 Max पण सादर केला जाऊ शकतो ज्याला 26 जानेवारीला Wi-Fi अलायन्स कडून मान्यता मिळाली होती. हा डिवाइस मोठ्या बॅटरी आणि एंड्राइड 8.0 ओरियो सह लॉन्च होऊ शकतो.
वर सांगितलेले सर्व स्मार्टफोंस सध्यातरी रुमर आहेत आणि ह्या डिवाइसेज माहिती आणि स्पेसिफिकेशन्स वर तोपर्यंत पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत असुस अधिकृत पणे MWC 2018 मध्ये यांच्याबाबतीत घोषणा करत नाही.