5G सुपरफास्ट इंटरनेट चालवण्यासाठी फोनमधील काही सेटिंग्स बदला.
नियमित सॉफ्टवेअर अपडेट करत रहा.
तुमचे नेटवर्क कनेक्शनची चेक करा.
जेव्हापासून भारतात 5G नेटवर्क सर्व्हिस लाँच झाली, तेव्हापासून प्रत्येकाला 5G चा लाभ घ्यायचा आहे. देशातील बऱ्याच शहरांत JIO आणि AIRTEL ने 5G सर्व्हिस लाँच केली आहे. जर तुमच्याकडे 5G हँडसेट असेल, आणि तुम्ही 5G क्षेत्रात राहत असाल तर तुम्ही या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकता. मात्र, 5G वापरण्यासाठी पात्र असूनही फोनमध्ये नेट स्लो चालतोय, तर तुम्हाला काही सेटिंग्स बदलण्याची गरज आहे. पुढील खास टिप्स नक्की फॉलो करा.
नेटवर्क कनेक्शन चेक करा :
सर्वप्रथम, तुम्ही 5G नेटवर्कशी कनेक्ट आहात याची खात्री करा. यासाठी तुम्हाला फोनमधील सेटिंग्समध्ये सेल्युलर डेटा अंतर्गत 5G निवडावे लागेल.
फोन रिस्टार्ट करा :
कधीकधी फोन रीस्टार्ट करणे हा सर्व समस्यांवरील उपाय असतो. थोडा वेळ थांबा आणि फोन रीस्टार्ट करा. बरेचदा फोन रिस्टार्ट केल्यास तुमच्या समस्यांचे निराकरण आपोआप होते.
सॉफ्टवेअर अपडेट :
फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स दिलेले आहेत. तुमच्या फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट नसेल तर ते अपडेट करा. याद्वारे सर्व बग्स फिक्स केले जातात,
ऍप्स फोर्स स्टॉप करा :
तुमच्या फोनमध्ये अनेक ऍप्स उघडलेले असतील, जे तुमच्या फोनचा डेटा वापरतात. त्यामुळे बॅकग्राउंडमध्ये सुरु असलेले सर्व ऍप्स बंद करा. त्याबरोबरच फोन आणि ऍप्सचे कॅशे क्लियर करा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.