Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन साठी लीक झाला एंड्राइड-Oreo आधारित MIUI9 ग्लोबल बीटा

Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन साठी लीक झाला एंड्राइड-Oreo आधारित MIUI9 ग्लोबल बीटा
HIGHLIGHTS

Xiaomi ने भारतात आपल्या Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन ला मिड-फेब्रुवारी मध्ये लॉन्च केले होते आणि हा देशात सर्वात प्रसिद्द स्मार्टफोन आहे.

Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन भारतात खुप प्रसिध्द आहे. लॉन्च नंतर या स्मार्टफोन ला भरपुर लोकांनी पसंती दर्शवली आहे. हा फोन भारतात मिड-फेब्रुवारी मध्ये लॉन्च करण्यात आला होता. तुम्हाला माहिती असेल की भारतात या स्मार्टफोन ला MIUI 9 आधारित एंड्राइड 7.1 नौगट वर लॉन्च करण्यात आले होते. पण या नंतर या स्मार्टफोन ला चीन मध्ये MIUI 9 वर आधारित एंड्राइड Oreo वर लॉन्च करण्यात आले होते. 
पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की आता चीनी स्टेबल रोम भारतीय ग्लोबल वेरिएंट मध्ये पण फ्लॅश केला जाऊ शकतो. यातील काही बग्स मुळे खुप लोक यापासून लांब आहेत. पण काही ठिकाणी एंड्राइड Oreo 8.1 वर आधारित ग्लोबल बीटा रोम Xiaomi Redmi Note 5 Pro च्या भारतीय वेरिएंट वर लीक झाल्याचे समोर आले आहे. 

हि बातमी किंवा मग आपण असे ही म्हणू शकतो की एंड्राइड Oreo चा हा बिल्ड FunkyHuawei।hub च्या माध्यमातून आमच्या समोर आला आहे. तुमच्या फोन मध्ये याला फ्लॅश करण्यासाठी तुम्हाला TWRP वर्जन वर कम्पेटिबल असावे लागेल. तुम्ही इथे जाऊ शकता आणि याला आपल्या फोन मध्ये फ्लॅश करू शकता. 

स्टेप 1: फ्लॅशिंग साठी फाइल्स तयार करणे 
तुम्ही तुमच्या Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन वर एंड्राइड चे नवीन वर्जन फ्लॅश करण्याआधी तुम्हाला आधी पासून फोन मध्ये असलेल्या फर्मवेयर फाइल्स मॉडिफाई कराव्या लागतील. 
याची सुरवात तुम्हाला अवश्यक असलेल्या फाइल्स डाउनलोड करण्या पासून होईल, या फाइल्स तुम्हाला फोन मध्येच मिळतील. 
•    MIUI 9 एंड्राइड 8.1 OREO फर्मवेयर फाइल एका फोल्डर मध्ये एक्सट्रेक्ट करुन घ्या, याला आपण फर्मवेयर फोल्डर पण म्हणू शकतो. 
•    याव्यतिरिक्त आता या सिस्टम img फाइल्स ज्यांना तुम्ही डाउनलोड केले आहे, त्यांना पण या फर्मवेयर फोल्डर मध्ये ट्रान्सफर करा. 
•    यासाठी तुम्हाला सोप्पी पेस्ट आणि रिप्लेस पद्धत वापरावी लागेल. 
•    या नंतर फर्मवेयर फोल्डर .tgz मध्ये कंप्रेस करा. हे कसे करायचे ते तुम्ही गूगल वर शोधू शकता. 

स्टेप 2: एंड्राइड 8.1 फर्मवेयर फाइल फ्लॅश करा 
वर सांगितलेली प्रक्रिया पुर्ण केल्यावर, आता या फर्मवेयर फाइल्स ला तुमच्या Xiaomi Redmi Note 5 Pro मध्ये न्या. तसेच तुम्हाला यांना TWRP चा वापर करून फ्लॅश पण करावे लागेल. 
•    आता पॉवर बटन वापरून तुमच्या डिवाइस ला पॉवर ऑफ करा. 
•    जेव्हा तुमचा फोन बंद होईल, तेव्हा एक साथ पॉवर आणि वॉल्यूम डाउन बटन प्रेस करा हे जोपर्यंत तुम्हाला फोन मध्ये वाइब्रेशन होत नाही तोपर्यंत करा. 
•    जेव्हा फोन वाइब्रेट होईल तेव्हा पॉवर बटन सोडून पण वॉल्यूम डाउन बटन दाबून ठेवा. 
•    आता इनस्टॉल बटन प्रेस करा आणि तिथे नेविगेट करा जिथे तुम्ही या फर्मवेयर फाइल्स आपल्या डिवाइस मध्ये स्टोर केल्या आहेत. 
•    आता स्क्रीन स्वाइप करून एंड्राइड 8.1 फर्मवेयर ची फ्लॅशिंग तुम्ही सुरू करू शकता. 

या प्रक्रिया साठी काही मिनिटांचा वेळ लागेल आणि या दरम्यान तुमचा फोन काही वेळा रीबूट होईल. पण Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन च्या शेवटच्या रीबूट नंतर तुमचा फोन एंड्राइड 8.1 OREO वर अपग्रेड झाला असेल. 
नोट: शेवटी एवढचं सांगेन की वरील प्रयोग हा प्रत्येकाने आपल्या जबाबदारी वर करायचा आहे. हे करताना तुमच्या फोनचे नुकसान पण होऊ शकते. तसेच तुमच्या डिवाइस ची वारंटी पण संपुष्टात येऊ शकते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo