Xiaomi Redmi Note 5 साठी भारतात जारी झाला MIUI 9.5 ग्लोबल ROM अपडेट
या लेटेस्ट अपडेट मध्ये भरपूर नवीन फीचर्स आहेत जसे की रीवेम्प्ड नोटिफिकेशन सेंटर, ब्राउजर कर्नल, क्विक सर्च विकल्प आणि बग फिक्सेज इत्यादी.
Xiaomi Redmi Note 5 साठी भारतात लेटेस्ट MIUI 9.5 ग्लोबल ROM अपडेट जारी झाला आहे या लेटेस्ट अपडेट मध्ये भरपूर नवीन फीचर्स आहेत जसे की रीवेम्प्ड नोटिफिकेशन सेंटर, ब्राउजर कर्नल, क्विक सर्च विकल्प आणि बग फिक्सेज इत्यादी.
काही दिवसांमध्ये यूजर्सना हा अपडेट OTA च्या माध्यमातून मिळेल. याव्यतिरिक्त यूजर्स आपल्या स्मार्टफोन मध्ये मॅन्युअली पण हा अपडेट चेक करु शकतात. मॅन्युअली हा अपडेट चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-सेटिंग्स>अबाउट>सिस्टम अपडेट्स.
Redmi Note 5 साठी MIUI V9.5.3.0.NEGMIFA अपडेट काही नवीन फीचर्स सह येतो जसे Mi Mover चा वापर करून अॅप्स डेटा सह आणि अॅप्स डेटा विना अॅप्स ट्रांसफर करने, स्क्रीन रिकॉर्डर साठी साउंड रिकॉर्डिंग ऑप्शन, इन-लाइन रिप्लाईज, नोटिफिकेशंस वाढवण्यासाठी वन-फिंगर गेस्चर इत्यादी. MIUI 9.5 Google च्या एंड्राइड 7.0 नौगट वर बनवला गेला आहे. मागच्या आठवड्यात Xiaomi ने Redmi Note 3 च्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन वेरिएंट, Redmi 4A, आणि Redmi Mi Max साठी MIUI 9.5 ग्लोबल स्टेबल रोम अपडेट जारी केला होता.
Xiaomi ने फेब्रुवारी महिन्यात आपला Redmi Note 5 स्मार्टफोन लॉन्च केला होता. Xiaomi Redmi Note 5 मध्ये 5.99 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. हा फोन दोन वेरियंट मध्ये सादर करण्यात आला आहे. 3GB रॅम सह 32GB ची स्टोरेज आहे तर 4GB रॅम सह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन एंड्राइड 7.1.2 नौगट वर आधारित MIUI 9 वर चालतो. यात 4000mAh ची बॅटरी पण देण्यात आली आहे. यात स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे.
Xiaomi Redmi Note 5 मधील कॅमेरा सेटअप पाहता यात 12MP चा रियर कॅमेरा आहे, जो डुअल LED फ्लॅश सह येतो यात 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे.