MIUI 10 ची घोषणा झाली, या Xiaomi स्मार्टफोंसना मिळेल सिंगल कॅमेरा पोर्ट्रेट मोड

MIUI 10 ची घोषणा झाली, या Xiaomi स्मार्टफोंसना मिळेल सिंगल कॅमेरा पोर्ट्रेट मोड
HIGHLIGHTS

Xiaomi ने गूगल kadun शिकून आपल्या स्मार्टफोंस साठी सिंगल कॅमेरा पोर्ट्रेट मोड चे स्वप्न साकार केले आहे.

Xiaomi ने काही दिवसांपूर्वी कंपनी च्या आठव्या वर्धापनदिन समारंभात MIUI 10 ची घोषणा केली आणि आज रेड्मी वाय 2 स्मार्टफोन च्या लॉन्च इवेंट मध्ये जागतिक स्तरावर याची घोषणा करण्यात आली आहे. MIUI 10 ची बीटा आवृत्ती जून च्या मध्या नंतर सुरू केली जाईल आणि सप्टेंबर मध्ये स्थिर आवृत्ती सुरू होईल. Xiaomi ने नवीन रोम साठी योग्य उपकरणांची एक यादी पण बनवली आहे. यात आहेत – एमआई मिक्स 2, एमआई 6, एमआई 5 एस प्लस, एमआई 5, एमआई 4, एमआई 3, एमआई नोट 2, एमआई मॅक्स 2, आणि एमआई मॅक्स 1 रेड्मी नोट 5 प्रो, रेड्मी नोट 5/5ए प्राइम, रेड्मी नोट 4/नोट 4 एक्स/नोट 4 (TW) आणि रेड्मी नोट 3 सारखे काही रेड्मी स्मार्टफोनला MIUI 10 अपडेट पण मिळेल. रेड्मी 5/5ए/4/4ए आणि रेड्मी 3एस, नवीन लॉन्च केलेल्या रेड्मी वाय 2 आणि रेड्मी वाय 1 लाइट आणि रेड्मी वाय 1 सोबत पण हा अपडेट मिळेल. 

रेड्मी वाई 2 च्या लॉन्च इवेंट मध्ये, Xiaomi चे उत्पादन प्रबंधक सुदीप साहू ने नवीन रोम च्या काही प्रमुख विशेषता समजावून सांगितल्या. साहू ने सांगितले की MIUI 10 मध्ये, कंपनी चा फोकस स्पीड, डिजाइन, साउंड आणि एआई पोर्ट्रेट इमेज कॅप्चरिंग वर राहिला आहे. प्रदर्शनाच्या बाबतीत, MIUI 10 "लॉक फ्री क्रिटिकल पाथ" आणि "सह-निर्भर प्राथमिकता" नावच्या दोन नवीन सुविधां सह येतात, ज्या मुळे 10 टक्क्यांपर्यंत आपल्या उपकरणांमध्ये वेगा मध्ये सुधार येईल. 

डिजाइन च्या बाबतीत, कंपनी चे म्हणेन आहे की त्यांनी बाजारातील ट्रेंड लक्षात ठेवले आहेत आणि यात जेस्चर चा समावेश करण्यात आला आहे, जे स्मार्टफोन वर नेविगेशन की ची जागा घेतो. रिसेंट स्क्रीन पण बदलण्यात आली आहे आणि यूजर्सना काही काळापूर्वी वापरलेले अॅप्स स्टॅक्ड कार्ड स्वरुपात बघण्यासाठी खाली स्क्रॉल करावे लागेल. यूजर्सना स्प्लिट व्यू सारख्या शॉर्टकट वापरण्यासाठी, अॅप्स काढून टाकण्यासाठी अॅप वर दीर्घ काळ दाबून ठेवावे लागेल. गोल आइकन साठी संपूर्ण रोम पुन्हा बनवण्यात आला आहे. Xiaomi ने MIUI 10 मध्ये काही ऑडियो मुद्द्यांची पण पुनर्बांधणी केले आहे आणि तुम्हाला मिळणार्‍या प्रत्येक मेसज सोबत नोटिफिकेशन स्वर वेगवेगळा येतो. टाइमर अॅप पण आता बदलण्यात आला आहे. 

Xiaomi MIUI 10 ला आपल्या जवळपास 26 स्मार्टफोंस वर या महिन्यात रिलीज करणार आहे, किंवा असे ही म्हणता येईल की अशी योजना बनवत आहे. त्याचबरोबर या लिस्ट मध्ये फक्त 11 स्मार्टफोंस असे असतील, ज्यांना सिंगल कॅमेरा पोर्ट्रेट मोड मिळणार आहे. Xiaomi ने असे सांगितले आहे की हा कॅमेरा मोड Xiaomi Mi MIX 2, Mi 5/Mi 5S Plus, Mi 5, Mi Note 2, Mi Max, Mi Max 2, Redmi Note 4, Redmi Note 4X, Redmi Note 3, Redmi 5 आणि Redmi 4/4X च्या फ्रंट आणि रियर कॅमेरा ला मिळणार आहे. 

तसेच कंपनी ने हे पण सांगितले आहे की Mi 6 आणि भारतातील Redmi Note 5 स्मार्टफोन च्या फक्त फ्रंट कॅमेरा ला हा फीचर मिळेल. त्याचबरोबर असे पण समोर येत आहे की अन्य स्मार्टफोंस पण या लिस्ट मध्ये सामील केले जाऊ शकतात पण याबद्दल अजून काही माहिती मिळाली नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo