लॉन्च च्या आधी स्क्रीनशॉट्स वरून MIUI 10 चा झाला खुलासा, असेल एंड्राइड P सारखा
लॉन्च च्या काही दिवसांपूर्वी काही स्क्रीनशॉट्स samor आले होते ज्या वरून सेटिंग्स मेनू आणि क्विक टॉगल सेक्शन ची माहिती मिळाली होती आणि त्याचबरोबर आगामी यूजर इंटरफेस च्या नोटिफिकेशन मेनू आणि मल्टी-टास्किंग सेक्शन चा पण खुलासा होत आहे.
Xiaomi Mi 8 सीरीज आणि Mi Band 3 सोबत Xiaomi 31 मे ला आयोजित होणार्या इवेंट मध्ये नवीन बदलां सह MIUI 10 सादर करू शकते. Xiaomi चे VP Wang Xiang ने अधिकृत पोस्टर द्वारा Mi Band 3 च्या लॉन्च ला दुजोरा दिला आहे. लॉन्च च्या काही दिवसांपूर्वी काही स्क्रीनशॉट्स samor आले होते ज्या वरून सेटिंग्स मेनू आणि क्विक टॉगल सेक्शन ची माहिती मिळाली होती आणि त्याचबरोबर आगामी यूजर इंटरफेस च्या नोटिफिकेशन मेनू आणि मल्टी-टास्किंग सेक्शन चा पण खुलासा होत आहे. TechnoCodex द्वारा हे स्क्रीनशॉट्स पब्लिश करण्यात आले आहेत आणि ग्राफिक रिन्यूअल व्यातिरिक हे फीचर्स यात दिसत आहेत.
MIUI 10 बद्दल बोलायचे झाले तर हा मोठया प्रमाणात एंड्राइड P सारखा आहे. हा लेटेस्ट एंड्राइड प्रमाणे वाइट आणि ब्लू डिजाइन सह येतो आणि हा एक शॉर्टकट पर्याय देतो ज्यामुळे तुम्हाला जास्त वापरल्या जाणार्या अॅप्स ची माहिती मिळते आणि चांगला यूजर्स एक्सपीरियंस मिळतो. त्याचबरोबर एक स्क्रीनशॉट वरून गॅलरी अॅपचा प्रीव्यू पण दिसत आहे जो ताज्या घेतलेल्या फोटो मधील मिनिएचर दाखवतो.
तसेच MIUI 10 आणि एंड्राइड P मध्ये सारखाच फुल टच जेस्चर कन्ट्रोल मिळतो. फक्त स्टॅण्डर्ड यूजर इंटरफेस ला रीन्यू करण्यात आले नाही तर कन्ट्रोल सेन्टर, लॉक स्क्रीन आणि वेदर विजेट ला पण नवीन अपडेट देण्यात आला आहे.
आता हे नाही सांगता येत की Mi 8 आणि Mi 8 SE मध्ये MIUI 10 प्रीइंस्टाल्ड येईल की नाही. पण एक लिस्ट वरून खुलासा होत आहे की कोणते डिवाइस MIUI 10 वर अपडेट केले जातील. या लिस्ट मध्ये Mi6, Mi5, Mi 5s, Mi 5s Plus, Mi4, Mi3, Mi 4S, Mi 4c, Mi Mix, Mi Mix 2, Redmi Y1, Redmi Y1 Lite, Mi Note 2, Mi Note 3, Redmi Note 3, Redmi Note 3 Pro, Redmi Note 4, Redmi Note 4X, Redmi 5A, Redmi Note 5A, Mi 5X, Mi Max, Mi Max 2, Redmi 4, Redmi 4X, Redmi 4A, Redmi 3, Redmi 3S, Redmi 3S Prime, Redmi Pro, Redmi 3X, Mi Pad 3, Redmi Note 5 Pro, Redmi S2, Mi 6X आणि Mi Mix 2S यांचा समावेश आहे.