ह्या कार्यक्रमात कंपनीने भारतासाठी अनेक मोठी घोषणा केली आणि मायक्रोसॉफ्ट डिवाईसची उपलब्धतेविषयीही माहिती दिली. नाडेला अशी माहिती दिली आहे की, पुढील काही महिन्यातच भारतात मायक्रोसॉफ्टचे अनेक नवीन डिवाईस प्रवेश करणार आहे, ज्यात नवीन लुमिया फोन आणि टॅबलेटचा समावेश असेल.
सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर निर्माता कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात पुढील महिन्यात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लुमिया 950 आणि लुमिया 950XL सादर करेल. कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी गुरुवारी मुंबईच झालेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
ह्या कार्यक्रमात कंपनीने भारतासाठी अनेक मोठी घोषणा केली आणि मायक्रोसॉफ्ट डिवाईसची उपलब्धतेविषयीही माहिती दिली. नाडेला अशी माहिती दिली आहे की, पुढील काही महिन्यातच भारतात मायक्रोसॉफ्टचे अनेक नवीन डिवाईस प्रवेश करणार आहे, ज्यात नवीन नोकिया लुमिया फोन आणि टॅबलेटचा समावेश असेल.
कंपनीने मागील महिन्यात ६ ऑक्टोबरला सेन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित कॉन्फरन्समध्ये एकसाथ तीन लुमिया फोन लाँच केले होते. मायक्रोसॉफ्ट लुमिया 950, लुमिया 950XL आणि लुमिया 550 यांचा समावेश होता. हे फोन यूएस आणि युरोपसहित अनेक बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र अजून भारतात लाँच झाले नााही. म्हणूनच नाडेलांनी अशी घोषणा केली आहे की, लवकरच मायक्रोसॉफ्ट हा तिन्ही स्मार्टफोन्सना भारतात लाँच करेल.
जर लुमिया 950XL च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाचा डिस्प्ले 1440x2560p (2k) रिझोल्युशनसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले आणि मायक्रोसॉफ्टने ह्यासाठी क्लियर ब्लॅक तंंत्रज्ञानाचा वापर आय़रिश रेकॉग्निशनसह केला आङे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. जो क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसरवर काम करतो. ह्यात आपल्याला 3300mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे.
स्मार्टफोन लुमिया 950 मधील फीचर्स हे जवळपास 950XL सारखेच आहेत. ह्याच्या डिस्प्लेमध्ये थोडा बदल आहे. ह्या ५.२ इंचाचा फुटप्रिंट डिस्प्ले दिला गेला आङे. स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आणि 3000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे.