मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी मायक्रोसॉफ्टने आज भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लूमिया 950 ड्यूल सिम आणि लूमिया 950 XL ड्यूल सिम लाँच केले आहेत. लूमिया 950 ड्यूल सिमची किंमत ४३,६९९ रुपये आणि लूमिया 950 XL ड्यूल सिमची किंमत ४९.४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही हँडसेटची प्री-ऑर्डर बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. दोन्ही स्मार्टफोन्स ११ डिसेंबरपासून उपलब्ध होतील.
मायक्रोसॉफ्ट लूमिया 950 आणि लूमिया 950XL स्मार्टफोन्स ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या एका कार्यक्रमात लाँच केले गेले होते. लाँचच्या काही दिवसांनंतर ह्या दोन्ही हँडसेटच्या ड्यूल सिम प्रकाराला भारतात उपलब्ध करण्याबाबत माहिती देण्यात आली होती. सिम कार्ड स्लॉटला सोडून मायक्रोसॉफ्ट लूमिया 950 ड्यूल सिम आणि लूमिया 950 XL ड्यूल सिम कार्डचे इतर फीचर्स सिंगल सिम प्रकारात असतील.
जर लुमिया 950XL च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंचाचा डिस्प्ले 1440x2560p (2k) रिझोल्युशनसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले आणि मायक्रोसॉफ्टने ह्यासाठी क्लियर ब्लॅक तंंत्रज्ञानाचा वापर आय़रिश रेकॉग्निशनसह केला आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. जो क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसरवर काम करतो. ह्यात आपल्याला 3300mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे.
स्मार्टफोन लुमिया 950 मधील फीचर्स हे जवळपास 950XL सारखेच आहेत. ह्याच्या डिस्प्लेमध्ये थोडा बदल आहे. ह्या ५.२ इंचाचा फुटप्रिंट डिस्प्ले दिला गेला आङे. स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आणि 3000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे.
त्याशिवाय मायक्रोसॉफ्टने पीसी-ग्लास लिक्विड कुलिंगचासुद्धा वापर केला आहे, जो प्रोसेसरला थंड करण्याचे काम करतो. असे तंत्रज्ञान प्रथमच मोबाईल फोन्समध्ये वापरले गेले आहे. त्याचबरोबर ह्यात 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला 200GB पर्यंत वाढवू शकतो. त्याचबरोबर दोन्ही स्मार्टफोन्समध्ये यूएसबी टाइप-C पोर्टसुद्धा दिला गेला आहे.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये २० मेगापिक्सेलचा लुमिया कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात कार्ल जिस लेन्स, OIS आणि ट्रिपल LED फ्लॅश RGB फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे.