मायक्रोसॉफ्ट लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लूमिया 650 सादर करु शकतो. मिळालेल्या बातम्यांनुसार, मायक्रोसॉफ्ट लूमिया 650ची विक्री पुढील महिन्यापासून सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आता ताज्या मिळालेल्या माहितीनुसार ह्या स्मार्टफोनच्या किंमतीविषयीही माहिती दिली जात आहे.
ही माहिती जर्मनीची वेबसाइट WInfuture ने दिली आहे. WInfuture नुसार, लूमिया 650 च्या काळ्या रंगाचा प्रकार O2 जर्मनीद्वारा विकला जाईल. ह्या स्मार्टफोनची किंमत 219 यूरो (जवळपास १६,२०० रुपये) असेल.
ह्याआधी ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली होती, ज्यात असे सांगितले गेले होते की, लूमिया 650 विंडोज 10 वर काम करेल. त्याचबरोबर ह्यात ५ इंचाची HD डिस्प्लेसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर, 1GB रॅम, 8GB च्या अंतर्गत स्टोरेज दिला जाणार आहे. ह्यात LED फ्लॅशसह 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा असू शकतो. फोनमध्ये 2000mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळेल.
मायक्रोसॉफ्टने आपली चीनी वेबसाइटवर लूमिया फोन X स्मार्टफोनचा व्हिडियो जारी केला आहे. ही पहिली वेळ आहे, जेथे लूमिया फोन X स्मार्टफोनविषयी माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्ट 1 फेब्रुवारीला लाँच करणार आपला शेवटचा लुमिया फोन
हेदेखील वाचा- ओवरकार्टवर फ्लॅश सेलद्वारा मिळणार वनप्लस 2 स्मार्टफोन