मायक्रोसॉफ्टच्या स्मार्टफोन लुमिया ५५०चा तपशील लीक झाला आहे. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात लाँच होऊ शकतो. हा एक विंडोज स्मार्टफोन असू शकतो. आणि हा LTE ला सपोर्ट करेल. ह्या स्मार्टफोनची किंमत CHF 114($117/ €104) असू शकते.
ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, मायक्रोसॉफ्ट लुमिया ५५० स्नॅपड्रॅगन २१० चिपसेट (क्वाड A53, 1.1 GHz प्लस एड्रेनो ३०४) असू शकतो. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ४.७ इंचाची ७२०x१२८०p रिझोल्युशनची डिस्प्ले दिली गेली आहे. हा स्मार्टफोन ८जीबी अंतर्गत स्टोरेज आणि विंडोज १० सह लाँच केला जाऊ शकतो.
त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट लुमिया ५५० मध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर आणि १.२ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असण्याची शक्यता आहे. त्यासोबतच ह्यात १जीबी रॅमसुद्धा असू शकतो. बातम्यांचा विचार केला असता, मायक्रोसॉफ्ट ६ ऑक्टोबरला एका कार्यक्रमाच्या दरम्यान मायक्रोसॉफ्ट लुमिया ९४० हा मध्यम किंमतीच्या श्रेणीतील स्मार्टफोनसुद्धा लाँच केला जाऊ शकतो.
मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षभरात आपल्या कोणत्याही फ्लॅगशिप स्मार्टफोनची घोषणा केली नाही. एप्रिल २०१४ मध्ये त्यांनी आपला लुमिया ९३० लाँच केला होता. त्याशिवाय त्याने अनेक फोन्स जसे की, लुमिया ५४०, ६४० आणि ६४०XL लाँच केले होते. आणि आता मायक्रोसॉफ्ट विंडोज १०सह आपले स्मार्टफोन लाँच करणार किंवा अपेक्षा केली जातेय की असे होणार. काही काळासाठी चर्चेत राहिलेले लुमिया ९५० आणि ९५०XL लाँच होऊ शकतात. मात्र मायक्रोसॉफ्ट यांना स्वतंत्र लाँच करणार नाही. ह्यांना काही अन्य डिव्हाईसेससोबत लाँच केले जाऊ शकते. आणि ह्या सर्वांना एकत्र ऑक्टोंबरमध्ये लाँच केले जाईल. ह्या दोन्ही स्मार्टफोनसोबत एक टेबलेट/लॅपटॉप हायब्रिड, एक सरफेस प्रो ४, एक बँड २ च्या सोबतच एक Xbox चा छोटा प्रकारही लाँच केला जाऊ शकतो.
मागच्या वेळेला ह्याला घेऊन काही अफवाही ऐकायला मिळत होत्या. त्यात विंडोज सेंट्रलचा एक अहवाल दर्शवत होता की मायक्रोसॉफ्ट ह्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपले नवीन स्मार्टफोन्स लुमिया ९५० आणि ९५०XL लाँच करु शकतो. ह्यासाठी मायक्रोसॉफ्ट दोन वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आयोजित करु शकतो. ज्यातील एक सप्टेंबरमध्ये आणि एक ऑक्टोबरमध्ये होऊ शकतो. हे न्युयॉर्क शहरात होऊ शकतात. ह्या स्मार्टफोनचे जर कोडनाव बघितली तर एकाचे नाव आहे टॉकमॅन आणि दुस-याचे नाव आहे सिटीमॅन. ह्या दोघांना ह्यावर्षी खूप आधीच लाँच केले पाहिजे होते, परंतु मायक्रोसॉफ्टने ते टाळलं.