करारानंतर आता येणा-या दिवसांत ह्या ब्रँडचे यूफोरिया, यूरेका प्लस आणि यूनिक स्मार्टफोन देशभरात ३० हजार रिटेल आऊटलेटमध्ये उपलब्ध होतील.
मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी यू टेलिवेंचर्सने आपल्या स्मार्टफोन्सला आता ऑफलाईन विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यू टेलिवेंचर्सने रिलायन्स रिटेलसह करार केला आहे. यू टेलिवेंचर्सआधी असा निर्णय श्याओमी आणि मोटोरोलोनेसुद्धा घेतला होता.
ह्या करारानंतर आता येणा-या दिवसांत ह्या ब्रँडचे यूफोरिया, यूरेका प्लस आणि यूनिक स्मार्टफोन देशभरात ३० हजार रिटेल आऊटलेटमध्ये उपलब्ध होतील.
ह्यासंबंधी यू टेलिवेंचर्सचे संस्थापक राहुल शर्मा म्हणाले की, ‘मोबाईलला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यू टेलिवेंचर्सने रिलायन्स रिटेलसह करार केला आहे. ही एकप्रकारे एक्सक्लुसिव्ह रिटेल सेलशी भागीदारी आहे, ज्याच्या मदतीने संपूर्ण देशात आमचे स्मार्टफोन्स उपलब्ध केले जातील.’
मायक्रोमॅक्स मागील वर्षीच आपला ऑनलाइन ओन्ली ब्रँड यू ला लाँच केले होते. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी श्याओमी आणि मोटोरोलाने भारतात ऑनलाईन ऑन्ली ब्रँडच्या माध्यमातून सुरुवात केली होती. तथापि,ह्या वर्षी ह्या ब्रँडने फ्लिपकार्टसह एक्सक्लुसिव्ह डिल संपवून ऑफलाईन जाण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या कंपन्यांचे अनेक हँडसेट आता फिजिकल स्टोरवरसुद्धा उपलब्ध आहेत.