गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेला मायक्रोमॅक्स कॅनवास एक्सप्रेस 4G स्मार्टफोन अखेरीस बुधवारी लाँच झाला. ह्या स्मार्टफोनला 2GB रॅम आणि 5 इंचाच्या आकर्षक डिस्प्लेसह लाँच केले आहे. आणि ह्या स्मार्टफोनची किंमत ६५९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
ह्या स्मार्टफोनची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत होती. आणि कंपनीने स्वत: ट्विट करुन ह्या स्मार्टफोनच्या लाँचविषयी माहिती दिली होती.
हा स्मार्टफोन आपल्या बजेटमध्ये येणारा असून तो 4G LTE सह लाँच केला आहे. ह्याला आपण फ्लिपकार्टच्या माध्यमातून घेऊ शकता. त्याचबरोबर हा स्मार्टफोनच्या उत्कृष्ट ऑफरसह बाजारात आला आहे. एअरटेल ह्या स्मार्टफोनसह 3G आणि 4G यूजर्ससाठी ‘डबल डेटा’ ऑफर करत आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन 4G LTE सपोर्ट लाँच केला आहे. मायक्रोमॅक्सने याआधी भारतीय बाजारात आपले अनेक 4G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यात कॅनवास ब्लेज 4G, कॅनवास फायर 4G आणि कॅनवास प्ले 4G यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अलीकडेच लाँच केलेला कॅनवास 5 सुद्धा 4G सपोर्टसह लाँच झाला होता, ज्याची किंमत ११,९९९ रुपये आहे.
कॅनवास एक्सप्रेस 4G बाबत बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात ५ इंचाची 720×1280 पिक्सेलची उत्कृष्ट डिस्प्ले दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये 1GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6753P प्रोसेसर आणि 2GB रॅम दिला आहे.
फोनमध्ये आपल्याला 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण 32GB पर्यंत वाढवू शकतो. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस सह रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.