मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने भारतात आपला नवीन स्मार्टफोन कॅनवास पल्स 4G लाँच केला आहे. कंपनीने ह्याची किंमत ९,९९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लुसिवरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.
जर मायक्रोमॅक्स कॅनवास पल्स 4G स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक (MT6753) प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. मायक्रोमॅक्स कॅनवास पल्स 4G भारतीय LTE बँडला सपोर्ट करतो आणि हा ड्यूल सिम ड्यूल स्टँडबाय फीचरसहित येईल. स्मार्टफोनमध्ये 2100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 3g, GPRS/ एज, वाय-फाय 802.11 B/G/N, मायक्रो-USB आणि ब्लूटुथचे वैशिष्ट्य दिले आहे. हा हँडसेट काळ्या रंगात उपलब्ध केला जाईल. ह्यात एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिले गेले आहे.
ह्या महिन्यात लाँच केला गेलेला हा मायक्रोमॅक्सचा तिसरा स्मार्टफोन आहे. ह्याआधी कॅनवास मेगा (E353) आणि कॅनवास मेगा 4G (Q417) ला अनुक्रमे ७,९९९ रुपयात आणि १०,९९९ रुपयात लाँच केले होते.