मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने आपला नवीन स्मार्टफोन कॅनवास पेस लाँच केला आहे. हा एक 4G स्मार्टफोन आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्ट केले गेले आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×854 पिक्सेल आहे. ह्यात 1.1 GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन क्वाडकोर प्रोसेसर आणि 1GB रॅम दिली गेली आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB वाढवता येऊ शकते.
ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार ही बॅटरी 9 तासांचा टॉकटाईम आणि 375 तासांचा स्टँडबाय टाइम देण्यास सक्षम आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास पेसमध्ये 4G LTE शिवाय 3G, वायफाय, मायक्रो-USB आणि GPS दिले गेले आहे. साइटवर उपलब्ध माहितीनुसार ह्या फोनमध्ये अॅमेझॉन, स्नॅपडील आणि सावनसारखे अनेक अॅप्लीकेशन प्री-लोडेड आहे.